Manikrao Kokate : कृषीमंत्री माणिकराव कोकाटेंना दोन वर्षांच्या कारावासाची शिक्षा, नेमकं प्रकरण काय ?

0

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे  (Nationalist Congress Party leader and state Agriculture Minister Manikrao Kokate)यांच्यासह त्यांचे बंधू सुनील कोकाटे यांच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे. कोकाटे बंधूंना 2 वर्षांचा कारावास आणि 50 हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate) यांच्यासह त्यांचे बंधू सुनील कोकाटे (Sunil Kokate) यांच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे. कोकाटे बंधूंना 2 वर्षांचा कारावास आणि 50 हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. 1995 मधील एका प्रकरणात त्यांना ही शिक्षा सुनावण्यात आली आहे. कागदपत्रांची फेरफार आणि फसवणूक केल्याचा त्यांच्यावर ठपका ठेवण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, 1995 ते 1997 च्या काळातील हे प्रकरण आहे. माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate) आणि त्यांचे बंधू सुनील कोकाटे (Sunil Kokate) यांनी शासनाकडून सदनिका घेतल्या होत्या. त्यासाठी त्यांनी आमचं उत्पन्न कमी आहे आणि आम्हाला दुसरं घर नाहीये, अशा स्वरूपाची माहिती दिलेली होती. त्या सदनिका त्यांना शासनाच्या माध्यमातून मिळालेल्या होत्या. मात्र त्यावेळी तत्कालीन अधिकाऱ्यांनी या संदर्भातील तक्रार केलेली होती. त्याचा तपास सुरू होता, त्या प्रकरणी त्यांना शिक्षा सुनावण्यात आली आहे.

नेमकं प्रकरण काय? जाणून घ्या सविस्तर

1995 ते 97 च्या दरम्यान माणिकराव कोकाटे आणि त्यांचे बंधू सुनील कोकाटे यांनी शासनाकडून ज्या सदनिका मिळतात, त्या सदनिका घेतल्या होत्या. त्यावेळेस त्यांनी आमचं उत्पन्न हे कमी आहे आणि आम्हाला दुसरं घर नाहीये अशा स्वरूपाची माहिती त्यांनी दिलेली होती. त्या सदनिका त्यांना शासनाच्या माध्यमातून मिळालेल्या होत्या. मात्र त्यावेळी तत्कालीन अधिकाऱ्यांनी या संदर्भातील तक्रार केलेली होती. 1995 साली कागदपत्रांच्या फेरफार आणि फसवणूक केल्याचा होता आरोप. माजी मंत्री तुकाराम दिघोळे यांनी याचिका दाखल केली होती. याबाबतचा गुन्हा नाशिकच्या सरकार वाडा पोलीस ठाण्यामध्ये दाखल करण्यात आलेला होता. हे प्रकरण 1997 पासून सुरु होतं आणि आज या प्रकरणाचा निकाल लागलेला आहे.

यामध्ये एकूण चार आरोपींना दाखवण्यात आलेले होते. त्यामध्ये माणिकराव कोकाटे आणि त्यांच्या बंधूसह इतर दोघांचा समावेश होता. मात्र इतर दोन जणांच्या बाबत कोर्टाने कुठल्याही स्वरूपाची शिक्षेची तरतूद केलेली नाही. मात्र माणिकराव कोकाटे आणि त्यांचे बंधू या दोघांना दोन वर्षाची शिक्षा आणि दंडाची शिक्षा ठोठावली. माणिकराव कोकाटे यांंच्यावरती कागदपत्रांची फेरफार आणि फसवणूक केल्याचा आरोप करण्यात आला होता. या आरोपांनुसार भादवी 420, 465, 471,47 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

माणिकराव कोकाटेंचं आमदारकी अन् मंत्रीपद धोक्यात?

न्यायालयाने राष्ट्रवादीचे आमदार आणि राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांना दोन वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे. लोकप्रतिनिधीला दोन किंवा त्यापेक्षा जास्त वर्षांची शिक्षा सुनावल्यास त्याचं सभागृहाचं सदस्यत्त्व रद्द होते. त्यामुळे आता माणिकराव कोकाटे यांना मंत्रिपद आणि आमदारकी गमवावी लागू शकते. त्यामुळे आता माणिकराव कोकाटे वरिष्ठ न्यायालयात दाद मागणार हे पाहणं महत्त्वाचे ठरणार आहे. धनंजय मुंडेंनंतर माणिकराव कोकाटे यांच्या रुपाने अजित पवार गटाचा दुसरा मंत्री अडचणीत आला आहे. धनंजय मुंडे यांच्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुसर्‍या नेत्याच्या मंत्रिपदावर संकट ओढावलं आहे. त्यामुळे आता याप्रकरणात माणिकराव कोकाटे, अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस काय पावले उचलणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

 

– मुख्यमंत्री कोट्यातील घरांमध्ये कागदपत्र सादर करताना फेरफार केल्याप्रकरणी राज्याचे कृषिमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते माणिक कोकाटे व त्यांच्या भावाला नाशिक जिल्हा सत्र न्यायालयाने दोन वर्ष कारावास आणि पन्नास हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. यामुळे माणिक कोकाटे यांचे राजकारण पुन्हा एकदा अडचणीत आले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की , कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांना न्यायालयाने मोठा दणका दिला आहे. मंत्री माणिकराव कोकाटे आणि त्यांचे भाऊ सुनील कोकाटे यांना नाशिक जिल्हा न्यायालयाने दोन वर्षाची शिक्षा सुनावली आहे.

दोन वर्षांचा कारावास आणि पन्नास हजार रुपये दंड अशी शिक्षा न्यायालयाने कोकाटे यांना सुनावली आहे. माणिकराव कोकाटे आणि त्यांच्या भावा विरोधात गुन्हा दाखल होता. १९९५ च्या प्रकरणात कागदपत्रांमध्ये फेरफार आणि फसवणुकीच्या प्रकरणात माणिक कोकाटे आणि त्यांच्या भावाविरोधात याचिका दाखल करण्यात आली होती.

१९९५ साली कागदपत्रांमध्ये फेरफार करून फसवणूक केल्याचा आरोपाखाली कृषीमंत्री माणिक कोकाटे आणि सुनील कोकाटे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी नाशिक जिल्हा व सत्र न्यायालयात खटला सुरू होता. ३० वर्षांनी या प्रकरणात जिल्हा व सत्र न्यायालयाने अंतिम निकाल दिला असून माणिकराव कोकाटे आणि त्यांच्या भावाला दोन वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. यासह दोघांनाही न्यायालयाने ५० हजार रुपयांचा दंड देखील ठोठावला आहे. माजी मंत्री तुकाराम दिघोळे यांनी न्यायालयात याप्रकरणी याचिका दाखल केली होती. भारतीय दंड विधान ४२०, ४६५, ४७१ आणि ४७ अन्वये माणिकराव कोकाटे आणि त्यांच्या भावा विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

नेमकं प्रकरण काय?

माणिकराव कोकाटे आणि सुनील कोकाटे यांनी शासनाकडून ज्या सदनिका मिळतात त्या घेतल्या होत्या. त्यावेळी त्यांनी आमचे उत्पन्न हे कमी आहे, आम्हाला दुसरे घर नाही अशा स्वरूपाची माहिती शासनाला दिली होती. त्यानंतर शासनाकडून माणिकराव कोकाटे यांना सदनिका मिळाल्या होत्या. मात्र अधिकाऱ्यांनी यासंदर्भात नाशिकच्या सरकारवाडा पोलीस ठाण्यात तक्रार केली होती. त्यानंतर या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात एकूण चार जणांचा आरोपी म्हणून उल्लेख करण्यात आला होता. मात्र कोर्टाने उर्वरित दोघांना कोणतेही शिक्षा सुनावलेली नसल्याची माहिती समोर आली आहे. तर माणिकराव कोकाटे आणि त्यांच्या भावाला दोन वर्षांची कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.