

राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर (Minister of State Dr. Pankaj Bhoyar) यांची उपस्थिती
प्रो. राजेंद्र सिंग सायन्स एक्सप्लोरेटरी (पीआरएसएसई) मध्ये गुरूवार, 27 फेब्रुवारी रोजी राष्ट्रीय विज्ञान दिवस साजरा केला जात आहे. या कार्यक्रमाला शालेय शिक्षण राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
उत्तर अंबाझरी मार्गावरील तारकुंडे धरमपेठ मुलांचे हायस्कूलच्या दुस-या माळ्यावरील पीआरएसएसईमध्ये दुपारी 5 वाजता हा कार्यक्रम होणार असून नवीन शैक्षणिक धोरण 2020च्या अनुषंगाने विज्ञान शिक्षणामध्ये प्रयोगात्मक शिक्षणावर यावेळी चर्चा केली जाणार आहे.
या कार्यक्रमाला नागपुरातील सर्व शाळा प्रमुख, व्यवस्थापन प्रतिनिधींनी उपस्थित राहावे, असे आवाहन पीआरएसएसईच्या संचालक डॉ. सीमा उबाळे यांनी केले आहे.