आकाश राजपुत ठरला राजश्री, दिपक धानोरकर बेस्ट पोजर

0

महाराष्ट्र नवनिर्माण सेना आयोजित भव्य शरीर सौष्ठव स्पर्धा थाटात

अमरावती (प्रतिनिधी) दि. ३० : संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवन येथे आयोजित मनसे जिल्हास्तरीय शरीर सौष्ठव स्पर्धा मोठ्या दिमाखदार सोहळ्यात पार पडली. या स्पर्धेचा राजश्री पुरस्कार आकाश राजपुत याने तर दिपक धानोरकर याने बेस्ट पोजर पुरस्कार पटकावला. ५ वर्षानंतर पहिल्यांदाच अतिशय भव्य स्वरूपात आयोजित या स्पर्धेचे आयोजन मनसेच्या वतीने करण्यात आले होते.

मनसे जनहित संघटक बबलू आठवले, शहर अध्यक्ष धीरज तायडे व बॉडी बिल्डिंग असोसिएशन अमरावती यांचे संयुक्त विद्यमाने आयोजित या स्पर्धेत 50 किलो वजन गटात ललित दुर्गे, वरूड याने प्रथम, मोहम्मद सोहेल, अमरावती याने द्वितीय, जुबेर खान, अमरावती याने तृतीय, स्वप्नील डांगे, अमरावती याने चतृर्थ व साद जमाल, अमरावती याने पाचवा पुरस्कार जिंकला. 55 किलो वजन गटात दिपक धानोरकर, परतवाडा याने प्रथम, मनिष वरूडकर, अमरावती याने द्वितीय, अक्षय पडोळे, अमरावती याने तृतीय, निलेश अटाळकर, वरूड याने चतृर्थ तर समृद्ध दुर्गे, वरूड याने पाचवा पुरस्कार जिंकला. 60 किलो वजन गटात राहुल मोरे, परतवाडा यास प्रथम, जुबेर खान,अमरावती यास द्वितीय, शेख राजीक,अमरावती यास तृतीय, सुफियान बेनीवाला,अमरावती यास चतृर्थ तर भारत मौजे, तिवसा यास पाचवा पुरस्कार देण्यात आला. ६५ किलो वजन गटात रामदास आदलिंग, अमरावती यास प्रथम, फैजान रजा, अमरावती यास द्वितीय, रूद्रेश बिसटवार,अमरावती यास तृतीय, मनिष माहातो,अमरावती यास चतृर्थ व उत्कर्ष मानकर, अमरावती यास पाचवा पुरस्कार मिळाला. तर ७० किलो वजन गटात आकाश राजपुत, अमरावती याने प्रथम, सर्वेश साहु, अमरावती यास द्वितीय, गौरव भगते, अमरावती यास तृतीय, फैजान खान, अमरावती यास चतृर्थ व शेख अयफाज, अमरावती यास पाचवा पुरस्कार बहाल झाला. या पुरस्कार वितरण सोहळ्याला मनसे नेते पप्पुभाऊ पाटील,शहर अध्यक्ष धीरज तायडे,शहर संघटक बबलू आठवले,शेतकरी जिल्हाध्यक्ष राम दुर्गे,शहर अध्यक्ष गौरव बांते, मनवीसे रा. कार्य.सदस्य सुशिल पाचघरे,मनविसे शहर अध्यक्ष हर्षल ठाकरे, कामगार सेना प्रमुख विक्की थेटे,उपजिल्हाप्रमुख सचिन बावणेर,मनसे सचिव रोशन शिंदे,महिला जिल्हाध्यक्ष रीनाताई जूनघरे, उपजिल्हाप्रमुख संगीताताई मडावी,उपाध्यक्ष पवन लेंडे, मयंक तांबुस्कर ,आश्विन सातव,विभाग अध्यक्ष अमर महाजन, अमन मडावी,परमेश्वर आठवले, रवि आठवले, निखील अर्मळ, रूपेश कोठार, योगेश आठवले, हर्षल आठवले, महेश आठवले, अमोल राऊत, जितेश सोनोने, अजय हरणे, आकाश भगत, राजकुमार वानखडे, रोहित आठवले, आतिश हरणे, अभिषेक लोणारे, वैभव आठवले, प्रविण घोरपडे, धनराज रामरख्यानी, बंटी पवार, प्रशांत पडोळकर, पवन अडलिंगे, देवा धुमाळे, स्वप्नील उतखेडे, पंकज तायडे,सुरज गवई, बबलु विरूळकर, राम काळमेघ, शेखर यादव, यश मानवटकर, आशिष दामले, निखील चौधरी, सारंग मामर्डे आदि उपस्थित होते.