

राष्ट्रीय अग्निशमन सेवा महाविद्यालय (एनएफएससी) येथे रविवारी ७६ वा प्रजासत्ताक दिन (Republic Day) उत्साहात साजरा करण्यात आला. एनएफएससीचे संचालक नागेश बी. शिंगणे यांनी अग्निशमन मैदानावर ध्वजारोहण केले. त्यानंतर त्यांनी अग्निशमन दलाच्या सर्व तुकड्यांची पाहणी केली व सर्व आमंत्रित पाहुणे, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना हार्दिक शुभेच्छा दिल्या.
नागेश शिंगणे म्हणाले, स्वातंत्र्य संग्रामातील नायकांप्रमाणेच अग्निशमन दलातील सैनिक देशाच्या संरक्षण करतात. त्यांना देशासाठी आणि जनतेच्या सेवेसाठी आपले जीवन पणाला लावणा-या सर्व महाविद्यालयातील अधिकारी, कर्मचारी, प्रशिक्षणार्थी आणि विद्यार्थ्यांची ही कामगिरी महाविद्यालयासाठी अभिमानास्पद आहे. यावेळी उत्कृष्ट कामगिरी करणा-यांना तसेच, दक्षता जागरूकता सप्ताह २०२४ च्या प्रश्नमंजुषा स्पर्धेतील विजेत्यांना पुरस्कार व प्रमाणपत्र वितरीत करण्यात आले.