राष्ट्रीय आरोग्य अभियान कंत्राटी अधिकारी कर्मचारी संघटनेचा मोर्चा

0

 

नागपूर- राष्ट्रीय आरोग्य अभियान कंत्राटी अधिकारी कर्मचारी कृती समितीकडून आज विधानसभेवर धडक मोर्चा काढण्यात आला. राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत कार्यास कर्मचारी अधिकारी यांना शासन सेवेत थेट समायोजन करणे बाबत आणि अन्य मागण्या न घेऊन शेकडोंच्या संख्येत आज अधिकारी व कर्मचारी या मोर्चात सहभागी झाले होते. हा मोर्चा यशवंत स्टेडियम वरून निघून मॉरिस कॉलेज टी पॉईंटवर येऊन धडकला. आरोग्य सेवेत मोठ्या प्रमाणात भरती होणे अपेक्षित आहे, त्या भरती मध्ये आम्हाला संलग्न करावे अशी मागणी आंदोलकांनी केली