गीतांजली कल्चरल इन्स्टिट्यूटद्वारे ‘नर्तनप्रिया’ कार्यक्रम 26 रोजी

0

 

(Nagpur)नागपूर, 24 डिसेंबर
गीतांजली कल्चरल इन्स्टिट्यूट नागपूर द्वारे नृत्यालंकार उत्सा बॅनर्जी यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ ‘नर्तनप्रिया’ हा कथक कार्यक्रम मंगळवार, 26 ड‍िसेंबर 2023 रोजी आयोजित करण्यात आला आहे. लक्ष्मीनगर येथील सायंटिफिक सभागृहात सायंकाळी 6 ते 9 वाजेदरम्‍यान होणा-या या कार्यक्रमात मुंबईच्‍या प्रस‍िद्ध कथक नृत्‍यांगना नेहा बॅनर्जी कथक नृत्‍य सादर करतील.
न‍िवेदिता मजुमदार यांच्‍या संयोजनात व सुपर्णा रॉय दिग्‍दर्शित केलेल्‍या या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून गुरू मदन पांडे यांची उपस्थिती राहणार आहे. सृष्टी रॉय आणि श्रेया रॉय यांचेही यावेळी कथक नृत्‍य सादर होणार असून ताल-निनाद हा कार्यक्रम तबलावादक (Ravi Satphale)रवी सातफळे आणि त्यांचे शिष्य प्रस्‍तुत करणार आहेत.

कार्यशाळेतील विद्यार्थ्‍यांचे देखील यावेळी सादरीकरण होईल. नेहा बॅनर्जी यांना तबल्यावर विवेक मिश्रा, हार्मोनियमवर सोमनाथ मिश्रा, की-बोर्डवर ओंकार अग्निहोत्री, पखवाजवर तुषार घरात तर स‍ितारवर अलका गुज्‍जर साथ देतील. सूत्रसंचालन श्‍वेता शेलगावकर करणार आहेत. हा कार्यक्रम नि:शुल्‍क असून नृत्‍यप्रेमींनी मोठ्या संख्‍येने उपस्‍थ‍ित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.