कथाकार पंकज कुरुलकर साधणार श्रोत्‍यांशी संवाद

0

विदर्भ साहित्‍य संघाचा ‘लेखक आपल्या भेटीला’ कार्यक्रम 23 रोजी
नागपूर (Nagpur), 22 सप्टेंबर
विदर्भ साहित्य संघातर्फे घेण्यात येणार्‍या ‘लेखक आपल्या भेटीला’ या उपक्रमांतर्गत सोमवार, 23 रोजी मुंबईचे सुप्रसिद्ध कथाकार पंकज कुरुलकर श्रोत्‍यांशी संवाद साधणार आहेत.

सीताबर्डी येथील विदर्भ साहित्य संघाच्या संदर्भ ग्रंथालयात सोमवारी सायंकाळी 5 वाजता हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमात पंकज कुरुलकर त्‍यांच्‍या कथेचे वाचन करतील. व्‍यवसायाने इलेक्ट्रॉनिक इंजिनीयर असलेल्‍या पंकज कुरुलकर यांनी आयटी इंडस्‍ट्रीत 31 वर्ष कार्यरत होते. 25 वर्षे व्‍यवसाय केल्‍यानंतर त्‍यांनी 2016 साली व्‍यवसायातून निवृत्‍ती घेतली व पूर्णवेळ कथा लेखनास स्‍वत:ला वाहून घेतले. त्‍यांची मराठी, इंग्लिश व हिंदीतील त्‍यांचे 21 पुस्‍तके प्रकाशित झाली असून नुकतेच त्यांचे ‘शालोम’ आणि ‘आधार’ हे दोन कथासंग्रह प्रकाशित झाले आहेत. राज्‍य शासनाच्‍या पुरस्‍कारासह त्‍यांना अनेक पुरस्‍कार प्राप्‍त झाले आहेत.

या कार्यक्रमाला उपस्थित राहावे, असे आवाहन विदर्भ साहित्‍य संघाच्‍या केंद्रीय कार्यकारी मंडळाने केले आहे.