नरेंद्र मोदी आज तिसऱ्यांदा शपथ घेणार; महाराष्ट्रातील ‘या’ ६ खासदारांच्या नावांची चर्चा

0

36 खासदार मंत्रिपदाची शपथ घेणार

लोकसभा निवडणुकीचे निकाल लागले आणि भाजपप्रणित एनडीएचे सरकार पुन्हा स्थापन होणार असल्याचे निश्चित झाले. नरेंद्र मोदी हे आज रविवारी तिसऱ्यांदा भारताचे पंतप्रधान म्हणून शपथ घेतील. संध्याकाळी राष्ट्रपती भवनात हा शपथविधी समारंभ होणार आहे. त्यांच्यासोबत भाजप आणि एनडीएतील मित्र पक्षांचे खासदारही मंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. एकूण 36 खासदार मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. त्यामध्ये महाराष्ट्रातीलही भाजपच्या चार मंत्र्यांच्या नावाच समावेश असून शिंदे गटाला एक कॅबिनेट आणि एक राज्यमंत्रीपद मिळणार असल्याचीही चर्चा आहे. (Narendra Modi, Leader of the Lok Sabha)

नितीन गडकरी आज घेणार मंत्रिपदाची शपथ
जवळपास 36 जणांचा मंत्रिमंडळ असणार
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत जवळपास ३६ जणांना मंत्री केले जाणार असल्याची चर्चा सुरु आहे. त्यासाठी आता पंतप्रधान कार्यालयातून मंत्र्यांना फोन केले जात आहे. मोदी 3.0 सरकारमध्ये टीडीपी आणि जेडीयूची महत्वाची भूमिका असणार आहे. त्यामुळे एनडीएतील मंत्रीपद दिले जाणाऱ्या सर्वच नेत्यांना फोन केले जात आहे. नितिन गडकरी, राजनाथ सिंह, जीतन राम मांझी, जयंत चौधरी, चिराग पासवान, जेडीयू नेता रामनाथ ठाकूर आणि अनुप्रिया पटेल यांना फोन आले आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. सध्या तरी महाराष्ट्रातून नितीन गडकरी, पीयूष गोयल, मुरलीधर मोहोळ रावेर लोकसभेच्या खासदार रक्षा खडसे यांना फोन आला आहे. रामदास आठवले यांनाही फोन आला आहे. दरम्यान, खासदार प्रतापराव जाधव मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीला गेले आहेत. त्यांना मंत्रीपद मिळणार असल्याचे संजय गायकवाड यांनी म्हटले आहे. त्यांनाही पंतप्रधान कार्यालयातून फोन आला आहे. दरम्यान, राष्ट्रवादी गटाकडून प्रफुल्ल पटेल यांना अजून फोन नाही. (Maharashtra Minister List for Modi 3.0 NDA Government)

नव्या NDA सरकारमध्ये अमित शाह यांची भूमिका काय?
नवीन सरकार स्थापनेची जोरात तयारी

लोकसभा निवडणुकीच्या २०२४च्या निकालावरून वेगवेगळ्या चर्चा रंगल्या आहेत. विजय-पराजयानंतर आता नवीन सरकार स्थापनेची तयारी जोरात सुरू आहे. पुढचे सरकार NDAचे बनणार आहे.गेल्या दोन सरकारांमध्ये भाजपाचा वरचष्मा होता, पण यावेळी भाजपला NDA तील घटक पक्षांना एकत्रित करण्यात येणार आहे. बुधवारी दिल्लीत एनडीएची बैठक झाली आणि या बैठकीत नरेंद्र मोदी यांची एकमताने नेतेपदी निवड करण्यात आली. २०१९ पेक्षा २०२४ चे चित्र वेगळे आहेत. अशा वेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची तिसऱ्या सरकारमध्ये काय भूमिका असेल याकडे साऱ्यांचेच लक्ष लागले आहे.

संभाव्य यादी 

अमित शाह
राजनाथ सिंह
नितिन गडकरी
एस जयशंकर
पीयूष गोयल
प्रल्हाद जोशी
जयंत चौधरी
जीतनराम मांझी
रामनाथ ठाकुर
चिराग पासवान
एच डी कुमारस्वामी
ज्योतिरादित्य सिंधिया
अर्जुन राम मेघवाल
प्रताप राव जाधव
रक्षा खड़से
जितेंद्र सिंह
रामदास अठवले
किरेन रिजुजु
राव इंद्रजीत सिंह
शांतनु ठाकुर
मनसुख मांडविया
अश्विनी वैष्णव
बंडी संजय
जी किशन रेड्डी
हरदीप सिंह पुरी
बी एल वर्मा
शिवराज सिंह चौहान
शोभा करंदलाजे
रवनीत सिंह बिट्टू
सर्वानंद सोनोवाल
अन्नपूर्णा देवी
जितिन प्रसाद
मनोहर लाल खट्टर
हर्ष मल्होत्रा
नित्यानंद राय
अनुप्रिया पटेल
अजय टमटा
धर्मेंद्र प्रधान
निर्मला सीतारामन
सावित्री ठाकुर
राम मोहन नायडू किंजरापु
चंद्रशेखर पेम्मासानी
मुरलीधर मोहल
कृष्णपाल गुर्जर
गिरिराज सिंह
गजेंद्र सिंह शेखावत
श्रीपद नायक
सी आर पाटील