

बुलढाणा (Buldhana)- महाविकास आघाडीचे उमेदवार नरेंद्र खेडेकर उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी आज सकाळी संत नगरी शेगाव येथे सपत्नीक श्री संत गजानन महाराजांच्या चरणी नतमस्तक झाले.
यानंतर खेडेकरांनी बुलढाणा येथे येऊन बुलढाणा लोकसभेचा महाविकास आघाडी कडून उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यांच्यासोबत महाविकास आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित आहेत.
शेतकऱ्यांच्या मालाला भाव देणारा खरा भूमिपुत्र असतो, स्वतःची इस्टेट वाढवणे हा भूमिपुत्र नसतो, अशी सावध प्रतिक्रिया महाविकास आघाडीचे उमेदवार नरेंद्र खेडेकर यांनी दिली.