
नागपूर NAGPUR – ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते नरेंद्र जिचकार Narendra Jichkar यांना काँग्रेस पक्षाच्या शिस्तपालन समितीने पक्षातून काढले आहे. दुसरीकडे आपण पक्षातच कार्यरत राहणार, ही सुडबुद्धीची कारवाई असल्याचे जिचकार यांनी म्हटले आहे. १२ ऑक्टोबर २०२३ रोजी नागपूर येथे झालेल्या आढावा बैठकीत ,पक्ष अध्यक्षासमोर पक्षाच्या पदाधिकाऱ्यांवर गुंडाकडून हल्ला चढवला गेला.
पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारणीने उदयपूर शिबिरात पारित केलेले प्रस्ताव नागपूर शहरात लागू करावे या मागणीसाठी मी उभा राहिलो.नागपूर शहरात जिथे पक्ष संघटना मजबूत होती त्याच नागपूर शहरात मागील दहा वर्षांपासून पक्ष संघटना रसातळाला जात असताना पक्षाचा सामान्य कार्यकर्ता म्हणून पक्ष संघटनेसाठी आवाज उठवणे हा गुन्हा ठरवला जात असेल तर ही कारवाई सुड बुध्दीने आणि नकारात्मक भूमिकेने केली आहे.
मागील अनेक वर्षांपासून पक्षाचे कार्य शहरात तन मन धनाने मी करीत आहे.१९६२६ पक्षाचे डिजिटल मेंबर बनवणारा कदाचित राज्यात मी एकमेव पदाधिकारी असेल,राजीव गांधी जयंती निमित्त टेक्नो रॅली, शिवशाही महोत्सव, गांधी जयंती या सारख्या अनेक कार्यक्रमातून मी काॅग्रेस विचारधारेचा प्रचार, प्रसार केला पण पक्षाने माझे म्हणणे न ऐकता माझ्या वरच कारवाई करणे हे आश्चर्यकारक आहे. मला जेव्हा ईमेल द्वारे माझी बाजू न ऐकता नोटिस देण्यात आली.
तेव्हा मी रीतसर उत्तर दिले.ज्या महाकाळकर सभागृहात आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती.त्या महाकाळकर सभागृहाचे सीसीटिव्ही फुटेज तपासणी करून जे खरे दोषी त्यांच्यावर कारवाई करा ही माझी भूमिका आहे.पण तसे झाले नाही, यापुढेही पक्षाचे कार्य मी करीतच राहणार. १४ जानेवारीला पक्षनेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रेला उपस्थित राहणार आणि १५ जानेवारीपासून नागपूर येथे जन आशीर्वाद यात्रा घेऊन शहरात घरोघरी जाऊन जनतेचे आशीर्वाद घेणार.या कारवाई विरूद्ध मी राष्ट्रीय कार्यकारिणीला पत्र व्यवहार करून सत्य वस्तुस्थिती मांडेल आणि राष्ट्रीय नेते योग्य ते निर्णय घेतील असा विश्वास नरेंद्र जिचकार यांनी व्यक्त केला आहे.