रुग्णांच्या मृत्यूंची केंद्राकडून दखल, कारवाई करणार

0

छत्रपती संभाजीनगर Chhatrapati Sambhajinagar : नांदेडसह छत्रपती संभाजीनगर येथील शासकीय रुग्णालयात झालेल्या रुग्णांच्या मृत्यूंची दखल आता केंद्र सरकारने घेतली आहे. सरकारने रुग्णांच्या मृत्यूबाबत रुग्णालय प्रशासनाकडून सविस्तर अहवाल मागविला असून संबंधितांवर कारवाई करण्यात (Hospital Patients Death Cases)येईल, अशी माहिती केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार यांनी दिली आहे.  Union Minister of State for Health Bharti Pawar सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नांदेडच्या घटनेनंतर छत्रपती संभाजीनगर शहरातील घाटी रुग्णालयात मागील २४ तासांत १० रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली असतांना, हा आकडा आता १८ वर जाऊन पोहचला आहे. गेल्या २४ तासांमध्ये छत्रपती संभाजीनगरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय म्हणजेच घाटी रुग्णालयात तब्बल १८ जणांच्या मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे. तथापि, हे मृत्यू औषधाच्या तुटवड्याने किंवा डॉक्टरच्या कमतरतेने, हलगर्जीपणामुळे हे मृत्यू झाले नसल्याचा दावा प्रशासनाने केला आहे. यामध्ये बहुतेक मृत्यू झालेले रुग्ण बाहेरून रेफर केलेले होते किंवा मरणासन्न अवस्थेत रुग्णालयात दाखल झाले होते, अशी माहिती अधिष्ठात्यांनी दिली आहे.

दरम्यान, राज्यातील शासकीय रुग्णालयांना केंद्र सरकारच्या माध्यमातून आवश्यक ती मदत दिली जाईल, असे आश्वासनही आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी दिले आहे. या घटना अतिशय दुर्दैवी असून अत्यवस्थ, अपघात आणि इतर गंभीर आजारांचे रुग्ण दगावल्याची प्राथमिक माहिती आहे. या रुग्णालयांत औषधांचा तुटवडा नसावा, अशी प्राथमिक माहिती आहे. मात्र या घटनेची सखोल चौकशी केली जाईल. त्याचबरोबर रुग्णालय प्रशासनाकडून याबाबत अहवाल मागवला जाईल.