हरभरा पिक धोक्यात; का झाले शेतकरी हवालदिल ?

0

 

नांदेड NANDED – रब्बी हंगामातील महत्त्वाचे पीक म्हणून हरभऱ्याचे पिक शेतकऱ्यांकडून घेतले जाते. मात्र गेल्या काही दिवसांपासून नांदेड जिल्हात वातावरणामध्ये मोठा बदल झाल्यामुळे हरभरा पिक धोक्यात आले आहे. लागवड खर्च निघण्याची देखील परिस्थिती नसल्याने शेतकरी संकटात सापडला आहे.

नांदेडच्या नायगाव तालुक्यातील कुंटूर येथील शेतकरी मारुती कदम यांनी आपल्या 14 एकर शेतापैका दहा एकर शेतात हरभरा पिकाची पेरणी केली. त्यासाठी वीस हजार रुपये लागवड खर्च करण्यात आला. मात्र, बदलत्या वातावरणामुळे दहा एकर शेतामधील हरभरा पिक धोक्यात आले आहे. त्यामुळे लागवड खर्च सुद्धा निघणार नसल्याची चिंता मारोती कदम या शेतकऱ्याने व्यक्त केली आहे