

त्रिपदी परिवारातर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन
नागपूर,(Nagpur) 30 एप्रिल
अखिल भारतीय त्रिपदी परिवार, नागपूर शाखेच्या वतीने नानामहाराज तराणेकर (Nanamaharaj Taranekar) यांच्या पुण्यतिथीनिमित्त शुक्रवार, 3 मे रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यात अभिषेक, पारायण, त्रिपदी आदी विविध कार्यक्रम होणार आहेत.
शिवाजी नगर येथील मानस सभागृहात शुक्रवारी सकाळी 8 ते सायंकाळी 6 पर्यंत विविध कार्यक्रम आयोजिले आहेत. सर्वप्रथम चैतन्यपीठ येथे सकाळी 8 वाजता श्रींच्या पादुकांना अभिषेक केला जाईल. 10 वाजता सप्तशती गुरुचरित्राचे सामूहिक पारायण करण्यात येईल. दुपारी 12 वा. पारायण भक्तांसाठी प्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. यानंतर सायंकाळी 6 वाजता करुणात्रिपदी होईल.
7 वाजता पुण्याचे सुप्रसिद्ध कीर्तनकार संदीपबुवा मांडके यांचे कीर्तन होणार आहे. आरतीनंतर महाप्रसादाचे वितरण होणार आहे. पारायणात सहभागी होण्याकरिता सोयीच्या दृष्टीने इच्छुक भक्तांनी आपली नावे देशमुख-9420445747 आणि मोहरील- 9373211474 यांच्याकडे नोंदवावी, तसेच अन्नदानासाठी इच्छुकांनी ऑफिसमध्ये संपर्क साधावा, असे आवाहन राजीव हिंगवे यांनी केले आहे.