नाना पटोलेंना दिल्लीश्वरांचा धक्का!

0

मुंबई-काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना हायकमांडने धक्का दिला आहे. आगामी लोकसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीची समन्वय समिती स्थापन करण्याचा निर्णय झाला होता. त्यात समितीसाठी काँग्रेसकडून नाना पटोले यांनी सुचविलेली नावे काँग्रेस नेतृत्वाने फेटाळून लावली आहेत. (Congress High Command withdraws names send for Coordination Committee) पक्षाच्या वरीष्ठ नेत्यांना ही नावे मान्य नसल्याचे सूत्रांनी सांगितले.
प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी समन्वय समितीसाठी पक्षातून पृथ्वीराज चव्हाण, बसवराज पाटील, नसीम खान या तीन नेत्यांची नावे दिली होती. ही नावे सुचविताना काँग्रेसच्या केंद्रीय पातळीवरील वरिष्ठांची परवानगी पटोले यांनी घेतली नसल्याची सूत्रांची माहीती आहे. पटोले यांनी कळविलेली यादी अंतिम नसल्याचे मित्रपक्षांना कळविण्याची पाळी काँग्रेस नेतृत्वावर आली आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते के. सी. वेणूगोपाल यांनी उद्धव ठाकरे यांना फोन करून पटोले यांनी दिलेल्या यादी अंतिम नसल्याचे कळविले. हा पटोलेंसाठी धक्का मानला जातो.
ही समन्वय समिती अतिशय महत्वाची ठरणार आहे. त्यात जागा वाटपाचा प्रश्न आणि इतर मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी ही समिती राहणार आहे. महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांचे प्रत्येकी तीन नेते समितीत असतील. उद्धव ठाकरे गटाकडून संजय राऊत, विनायक राऊत आणि अनिल देसाई, तर शरद पवार गटाकडून जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड, अनिल देशमुख यांचा या समितीत समावेश आहे. आता काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजीमुळे नवी नावे केव्हा जाहीर होतात, याकडे लक्ष लागलेले आहे.