नागपूरच्या प्रख्यात समाजसेविका मीराताई कडवे यांना ‘स्वातंत्र्यवीर सावरकर पुरस्कार’ प्रदान

0

दि. २६ फेब्रुवारी २०२५ रोजी पुणे येथे नागपूरच्या प्रख्यात समाजसेविका मीराताई कडवे यांना ‘स्वातंत्र्यवीर सावरकर पुरस्कार’ प्रदान करून गौरविण्यात आले. या विशेष सन्मानाच्या निमित्ताने श्री ज्ञानेश्वरी प्रतिष्ठान, नागपूर तर्फे त्यांचे अभिनंदन करण्यात आले.

मीराताई कडवे या राष्ट्र सेविका समितीच्या कार्यकर्त्या असून, त्यांनी हिंदुत्व, राष्ट्रसेवा आणि समाजप्रबोधनाच्या कार्यात महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. विशेषतः ‘लव्ह जिहाद’ आणि कट्टर हिंदुत्ववादी विचारसरणीच्या प्रचारासाठी त्यांनी उल्लेखनीय कार्य केले आहे. या अभिनंदन समारंभात त्यांनी आपल्या सामाजिक कार्याचा अनुभव उपस्थितांसमोर मांडला.

या कार्यक्रमाला विवेक काळे, सौ. उत्तरा काळे, संध्या मुळे, प्रीती दाभाडे आणि सौ. मनीषा कुळकर्णी हे मान्यवर उपस्थित होते. त्यांनीही मीराताईंच्या कार्याचा गौरव करत त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.