नागपूरच्या प्रदूषणात नोव्हेंबरमध्ये पुन्हा वाढ

0

30 पैकी 30 दिवस अधिक प्रदूषण,महाल सर्वाधिक प्रदूषित

आधीच प्रदुषित असलेल्या नागपूर मध्ये हिवाळ्यात प्रदूषणात पुन्हा वाढ झाली आहे. ऑक्टोबर पेक्षा नोव्हेंबर मध्ये दिवाळीचे
फटाके आणि इतर अनेक घटकामुळे येथे प्रदूषनात पुन्हा वाढ झाल्याचे प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या आकडेवारी वरून लक्षात येते.येथे सिव्हिल लाइन्स,महाल, अंबाझरी आणि रामनगर येथे सतत वायू गुणवत्ता निरीक्षण केंद्र(CAAQMS) आहेत.त्या चारही केंद्राची केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने दिलेली आकडेवारी नागरिकांना धडकी भरविणारी आहे.
नोव्हेंबर च्या महिन्याच्या एकूण 30 दिवसापैकीं नागपूर चे चारही विभाग 30 दिवस प्रदुषित होते.ह्या प्रदूषकामध्ये सूक्ष्म धूलिकण 2.5 चे प्रमाण अधीक आहे हे आरोग्यासाठी धोकादायक आहे अशी माहिती पर्यावरण अभ्यासक प्रा सुरेश चोपणे ह्यानी दिली.

महाल

●0-50 निर्देशांक चांगला मानला जातो परंतु येथे असा एकही दिवस नव्हता.
● 51-100 Satisfactory (समाधान कारक) असा निर्देशांक असलेला सुध्दा एकही दिवस नव्हता .
● 101-200 AQI (Moderate) निर्देशांक असलेले 09 दिवस प्रदुषित होते
●201-300 (Poor) निर्देशांक असलेले जास्त प्रदूषनाचे 19 दिवस आढळले.
● 301-400 निर्देशांक असलेले very poor श्रेणीतील अतिशय प्रदूषणाचे 02 दिवस आढळले.

सिव्हिल लाईन्स

● 0-50 निर्देशांक चांगला मनाला जातो परंतु येथे असा एकही दिवस नव्हता.
●51-100 समाधान कारक ( Satisfactory) असा निर्देशांक केवळ 02 दिवस होता .
● 101-200 AQI (Moderate) निर्देशांक असलेले 15 दिवस प्रदुषित आढळले.
● 201-300 (Poor) निर्देशांक असलेले जास्त प्रदूषनाचे 13 दिवस आढळले.
● very poor आणि severe श्रेणीतील दिवस आढळले नाही

अंबाझरी

●0-50 निर्देशांक चांगला मनाला जातो परंतु येथे असा एकही दिवस नव्हता.
●51-100 समाधान कारक असा निर्देशांक सुध्दा केवळ 02 दिवस होता .
● 101-200 AQI (Moderate)प्रदुषित निर्देशांक असलेले 17 दिवस होते
●201-300 (Poor AQI ) निर्देशांक असलेले जास्त प्रदूषनाचे 11 आढळले.
●301-400 very poor आणि 401-500 severe श्रेणीतील अतिशय प्रदूषणाचे दिवस आढळले नाही.

रामनगर

● 0-50 निर्देशांक चांगला मनाला जातो परंतु येथे असा एकही दिवस नव्हता.
●51-100 समाधान कारक असा निर्देशांक सुध्दा केवळ 02 दिवस होता .
●101-200 AQI (Moderate)निर्देशांक असलेले 21 दिवस प्रदुषित होते
● 201-300 (Poor) निर्देशांक असलेले जास्त प्रदूषनाचे 07 दिवस आढळले.
●very poor आणि Severe श्रेणीतील अतिशय प्रदूषणाचे दिवस आढळले नाही.
प्रदूषण निर्देशांक कसा ठरवला जातो
● 0-50 AQI (Good) निर्देशांक आरोग्यासाठी चांगला मानला जातो.
●51-100 AQI ( Satisfactory) निर्देशांक हा समाधानकारक प्रदूषण परंतु आधीच आजारी लोकांना अपायकारक मानले जाते.
●101-200 AQI ( Moderate) निर्देशांक सर्वसाधारण प्रदूषित श्रेणीत येत असून सर्वांनाच आरोग्यासाठी धोकादायक आहे.
●201-300 AQI (Poor) निर्देशांक असून जास्त प्रदुषित आणि आरोग्यासाठी धोकादायक मानला जातो.
●301-400 AQI (Very Poor) निर्देशांक हा अति प्रदूषित आणि सर्व नागरिकांना धोकादायक मानला जातो-
●401-500 AQI (Severe)निर्देशांक हे अतिशय धोकादायक प्रदूषण मानले जाते.
हवा गुणवत्ता निर्देशांक काढण्यासाठी कमीत कमी 3 तर जास्तीत जास्त 8 प्रदुषकाना प्रमाण मानले जाते. त्यात धूलिकण,2.5,10. ओझोन,कार्बन मोनोकसाईड, सल्फर डाय ओकसाईड, नायट्रोजन डाय ओकसाईड, अमोनिया, लीड ह्या
प्रदूषकांना मिळून निर्देशांक काढला जातो.
————————–

प्रदूषनाची कारणे

वाहनांची वाढती संख्या ,त्यातून निघनारा धूर ,धूळ , रस्त्यावरील धूळ,कचरा ज्वलन ,बांधकाम आणि स्थानिक उद्योग ,इत्यादी अनेक कारणांमुळे अलीकडे सर्वत्र प्रदूषनात मोठी वाढ झाली असून त्यातून आरोग्याच्या अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. प्रत्येक शहरात अलीकडे विकासासाठी विविध बांधकाम, रस्ते बांधणे सुरू असते त्यातच वाहनाच्या संख्येत वाढ होत आहे.त्यातून मोठ्या प्रमाणावर धूळ आणि धूर बाहेर पडते.बहुतेक शहरात सुद्धा अश्याच समस्या निर्माण होत असल्याने प्रदूषणात सतत वाढ होत असल्याचे प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या आकडेवारी वरून लक्षात येते.

प्रदूषणामुळे रोगराईत वाढ

हिवाळ्यात दरवर्षी प्रदूषण वाढते.थंडी मुळे आणि संथ वाऱ्या मुळे प्रदूषके वाहून न जाता एकाच ठिकाणी जमिनीवर स्थिर होतात.पूर्वी हिवाळा आरोग्यासाठी चागला मानला जात असे परंतु अलीकडे प्रदूषणामुळे तो धोकादायक ठरत आहे. प्रदूषणामुळे आधिच श्वसनाच्या रोग् असणाऱ्या ना हानिकारक असते ,तसेच नव्याने श्वसनाचे रोग वाढू शकतात.दमा, ब्रॉकाय टिस, टीबी,हृदय रोग आणि मानसिक रोग वाढतात,

प्रदूषण नियंत्रण कसे होणार

अलीकडे औद्योगिक क्षेत्रात सर्वाधिक प्रदूषण असले तरी महाराष्ट्रात सर्वच जील्ह्यात प्रदूषण वाढले आहे.वाढती वाहने,धुळीचे रस्ते, कचरा ज्वलन,कोळसा ज्वलन आणि शहरातील व्यावसाईक प्रतिष्ठाण कारणीभूत असतात.
हे प्रदूषण नियंत्रण ठेवण्यासाठी वृक्षसंख्येत वाढ करणे,शहरात सार्वजनिक वाहने,सायकल चा उपयोग वाढविणे, वाहनांच्या संख्येत घट करणे,कचरा न इळणे ,उदयोगांणी प्रदूषण रोखणे , नागरिकांनी सुद्धा प्रदूषण होऊ नये अश्या उपाययोजना करणे इ ,प्रशासनाणे कडक अनेक उपाय योजना राबविण्यात आल्या तरच प्रदूषनावर नियंत्रण होऊ शकेल
——-
1/12/2023
प्रा सुरेश चोपणे
पर्यावरण अभ्यासक
(माजी सदस्य REC, केंद्रीय वने,पर्यावरण आणि जलवायू मंत्रालय,दिल्ली)
9822364473