

63 व्या हौशी मराठी महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धा अंतिम फेरीत नागपुरच्या “द ब्लॅकंड इक्वेशन” या नाटकाला अभिनयाचे दोन रौप्य पदक….
दिनांक 17 फेब्रुवारी 2025 ते 15 मार्च 2025 या कालावधीत रंग शारदा नाट्यमंदिर बांद्रा मुंबई येथे अतिशय जल्लोषात झालेल्या महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धा अंतिम फेरीत एकूण 44 नाट्यप्रयोग सादर करण्यात आले. प्राथमिक फेरीतील 350 पेक्षा जास्त नाटकांमधून निवड झालेल्या या 44 प्रयोगात चंद्ररथ थिएटर्स नागपूर निर्मित आणि रुखमाई सेवा मंडळ नागपूर प्रस्तुत ‘द ब्लॅकंड इक्वेशन’ या नाटकास अभिनयाचे दोन रौप्य पदक अनुक्रमे भावना चौधरी आणि यशवंत चोपडे यांना मिळाले….
द ब्लैकन्ड इक्वेशन
लेखक: चंद्रकांत गुलाबराव चौधरी
दिग्दर्शक: यशवंत दशरथजी चोपडे
निर्मिती प्रमुख: देवयानी चोपडे, चंद्रकांत चौधरी
सूत्रधार: विलास कुबडे
नृत्यदिग्दर्शक: सतिश बगडे
नेपथ्य: देवयानी चोपडे, धर्मेंद्र चोपडे
प्रकाश योजना: ऋषभ धापोडकर
संगीत: अमित कुबडे
निर्मिती सहाय्य : प्रशांत मंगदे,दिप्ती भाके,निखिल टोंगळे,सचिन वंजारी, प्रशांत खडसे
विशेष आभार: श्री नंदलाल राठोड- उपकल्याण आयुक्त, नानाभाऊ मिसाळ, कामगार कल्याण भवन रघुजी नगर नागपूर
पात्र परिचय:
1) यशवंत चोपडे:
I) रॉबर्ट ओपेनहायमर
II) डॉ. योशिओ निशिना
III) तामिकी
IV) हकुझो
V) लष्करी अधिकारी
2) भावना चौधरी:
I) ऊर्जा: भावना चौधरी
II) मासाको
III) जेतो
IV) जनरल मिस कावाबे
V) नताली रेमंड
आणि सतिश बगडे, नमिता गोंधळेकर – देशपांडे, करूणा मंगदे, हर्ष नागभिडे, चंद्रा चौधरी, मनीष चौधरी.