बीआयटीतील हॅकाथॉनमध्ये नागपूरच्या संघांची बाजी

0

ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प व बीआयटीचे संयुक्त आयोजन
विदर्भासह तेलंगणातील २५ संघांचा सहभाग

चंद्रपूर(Chandrapur) : ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प आणि बल्लारपूर इन्स्टट्यिुट ऑफ टेक्नालॉजी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने नुकतेच २४ तासांच्या हॅकाथॉनचे आयोजन बीआयटीत करण्यात आले होते. या स्पर्धेत विदर्भातील नागपूर, चंद्रपूर, वर्धा जिल्ह्यातील संघांसह तेलंगणातून २५ नामांकीत संघ सहभागी झाले होते. दरम्यान, दोन प्रकारामध्ये आयोजित या हॅकाथॉनमध्ये नागपुरातील सेंट विन्सेट पलोटी कॉलेज ऑफ इंजिनिअरींग ॲण्ड टेक्नालॉजी येथील दोन्ही संघांनी बाजी मारली.
बल्लारपूर तालुक्यातील बीआयटीच्या कॅम्पसमध्ये ‘सहअस्तित्वासाठी नवनिर्मिती’ या थिमअंतर्गत मानव आणि वन्यजीव यामधील समतोल साधण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून उपयुक्त उपाय शोधण्यास प्रेरणा देण्याच्या उद्देशाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी उत्स्फुर्त प्रतिसाद देत वेगवेगळ्या टिमने सहभाग घेतला होता. दरम्यान, स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी सहभागी झालेल्या टिमधील विद्यार्थ्यांना ताडोबाची सफारी घडवून आणण्यात आली. या सफारी दरम्यान विद्यार्थ्यांना ताडोबातील सुरक्षारक्षक प्रणालीची अधिकाऱ्यांकडून प्रत्यक्ष माहिती देण्यात आली. त्यानंतर या स्पर्धेत सहभागी झालेल्या टिमपैकी परिक्षकांनी पाच अंतिम संघांची निवड केली होती. परिक्षण रूची टंडन, पियूष गुप्ता, डॉ. सत्यनारायण आणि लव्हली शर्मा यांच्या माध्यमातून करण्यात आले.
हॅकाथॉनच्या परिक्षकांनी निवड केलेल्या पाच टिमच्या माध्यमातून पुन्हा सादरीकरण करण्यात आले. यावेळी मुख्य अतिथी म्हणून ताडोबाचे क्षेत्रसंचालक प्रभुनाथ शुक्ला, बीआयटीचे कार्याध्यक्ष संजय वासाडे उपस्थित होते. यावेळी हॅकाथॉनबाबत मार्गदर्शन करण्यात आहे. त्यानंतर निवड केलेल्या पाचही टिमधून वन्यजीव-मानव संघर्ष प्रकारातून टिम न्युरल निन्जाने क्रमांक पटकाविला. तर पिक आणि जिवनशैली सुरक्षा प्रकारातून क्रेझी-५ या टिमने क्रमांक पटकाविला. दोन्ही संघ नागपुरच्या सेंट विन्सेट पलोटी कॉलेज ऑफ इंजिनिअरींग ॲण्ड टेक्नालॉजी या महाविद्यालयातील असून हॅकाथॉनवर या संघांनी आपले नाव कोरले. त्यानंतर विजयी संघांना पाहुण्यांच्या हस्ते स्मृतीचिन्ह, प्रमाणपत्र आणि बक्षीस देवून गौरविण्यात आले. स्पर्धेदरम्यान ताडोबाच्या कोअर झोनचे उपसंचालक आनंद रेड्डी यांनी सर्व टीम सदस्यांना मार्गदर्शन केले. TATR डीएफओ सचिन शिंदे यांनी आयोजनासाठी सहकार्य केले. ताडोबाचे सोसिअल सायंटीस्ट साकेत अवस्थी यांच्या संयोजनात कार्यक्रमाचे नियोजन आणि अंमलबजावणी करण्यात आली. बीआयटीच्या माध्यमातून संचालक डॉ. रजनीकांत मिश्रा, पाॅलिटेक्निकचे प्राचार्य श्रीकांत गोजे,⁠ स्टुडंट डेव्हलपमेंट विभागाच्या डीन डॉ. अर्चना निमकर, श्यामला शेंडे,⁠अविनाश खंडेराव, दिव्या कोरडे, प्राध्यापक वृंद, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.