

एकल प्रकारात अवनी तर समूह नृत्यात स्कूल ऑफ स्कॉलरची बाजी
नागपूर (Nagpur)1 सप्टेंबर :- शुद्धी बहुउद्देशीय सामाजिक शिक्षण संस्थेतर्फे आयोजित शनिवारी झालेल्या लोकनृत्य स्पर्धेत सोलो नृत्य प्रकारात अवनी भावसार हिने, तर समूह नृत्यप्रकारात स्कूल ऑफ स्कॉलरने बाजी मारली.
लोकमान्य टिळक सभागृह, कस्तुरबा भवन, बजाज नगर येथे झालेल्या या नृत्य स्पर्धेत 5 ते 14 वयोगटातील सोलो प्रकारात अवनी भावसार प्रथम, हर्षिका चव्हाण द्वितीय, जिविका येंडे तृतीय, अवनीश काळे चतुर्थ, तर नव्या गौरकर हिला पाचवे पारितोषिक मिळाले. तसेच 5 ते 50 वयोगटासाठी असलेल्या समूह नृत्य प्रकारात स्कूल ऑफ स्कॉलर प्रथम, गोंडवाना गोटुल द्वितीय, आर. एस. मुंडले धरमपेठ तृतीय, हॉरिझॉन डान्स ग्रूप चतुर्थ, तर आनंदी ग्रूपला पाचवे पारितोषिक मिळाले. रोख पारितोषिक, सन्मानचिन्ह देऊन सर्वांचा सत्कार करण्यात आला. सर्व सहभागी कलावंतांना सर्टिफिकेट देण्यात आले. यावेळी संस्थेचे सचिव सुनीता गजभिये, अध्यक्ष रमेश कोचे उपस्थित होते.
स्पर्धेचे परीक्षण जितेंद्र शेगावकर, सचिन धामनेकर, सपना पटेल यांनी केले. निवेदन श्रद्धा रायकर यांनी केले. आभा मेघे, संजय रहाटे, श्यामला कुबडे, विवेक कुलकर्णी यांची प्रमुख उपस्थिती होती तर संकल्पना व सादरीकरण विलास कुबडे यांचे होते.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता रुख्माई सेवा मंडळाचे विलास कुबडे, निलशोभा बहुउद्देशीय संस्थेचे नितीन पात्रीकर, शील कला सागरचे योगेश राऊत, अजित बालक मंदिरचे रामदास मानेराव, श्री सद्गुरू कृपा बहुउद्देशीय संस्थेचे दीप्ती भाके, प्रदूषण नियंत्रण व स्वास्थ संवर्धन बहुउद्देशीय संस्थेचे धनराज मोटे प्रशांत मंग्दे यांचे सहकार्य लाभले.