बेरोजगार, शेतकरी करणार उद्या हल्लाबोल- नाना पटोले

0

 

नागपूर NAGPUR – अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले. कापूस, ऊस, द्राक्ष उत्पादक आज त्यांच्या हातात काही नाही. याविरोधात सोमवारी काँग्रेस पक्षाने हल्लाबोल करण्याचा निर्णय घेतला आहे. काल भाजपने रोजगार नमो महामेळावा घेतला. तरुणांची थट्टा चालवली आहे.बेरोजगारी, महागाई या विषयाला धरून आमचा मोर्चा असणार असल्याचे प्रतिपादन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले  NANA PATOLE यांनी माध्यमांशी बोलताना केले.

पटोले म्हणाले 23 सप्टेंबरला पावसामुळे मोठं नुकसान नागपुरात झालं. नुकसानग्रस्त लोकांना अजूनही मदत मिळाली नाही. जागोजागी खोदकाम सुरू आहे. रस्त्याच्या माध्यमातून भ्रष्टाचार आहे.

मनोज जरांगे व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ओबीसी विरुद्ध मराठा करून सामाजिक परिस्थिती मालिन करण्याचे काम करत आहे. मोर्चात आम्ही यांचा पापाचा पाढा वाचणार आहे. या मुद्द्यावर दोन समाजात अंतर वाढलं, भविष्यात कमी होईल की नाही? अशी परिस्थिती झाली आहे. आरक्षण पाहिजे त्यासाठी संविधानिक पद्धती आहेत. सर्वेक्षण करून त्यांना आरक्षण देता येत, तो मार्ग आहे. यातून तोडगा काढू शकतो. मुस्लिमातील अनेक जाती आहेत, अनेक जाती अजूनही प्रलंबित आहेत, ज्यासाठी जनगणना आवश्यक आहे. आज अनेक प्रश्न आरक्षणाच्या नावावर निर्माण झाले आहेत. देशाचे पंतप्रधान सांगतात, महिला तरुण, गरिबी ही जात आहे. यात खरी जात समजली आहे, आरक्षण संपुष्टात आणण्याचे हे काम करत आहेत.
जातीवादी व्यवस्थेत विधानसभा निकाल फायद्याचे ठरले. महाराष्ट्रातील जाती व्यवस्था पाहून धार्मिक विभाजन करण्यासाठी काम केले जात आहे. जरांगे आणि फडणवीस वादात
सरकारचा खरा चेहरा समोर येणार आहे. शेतकरी संकटात असताना 3 हेक्टरपर्यंत मदत द्यायला सुरुवात केल्याचे सांगतात. पण मदत मिळाली नाही. मी स्वतः शेतकऱ्यांना भेटलो, साईट उघडत नाही, मदत मिळाली नाही, इन्शुरन्स कंपनीला फायदा होत आहे, रोज 14 शेतकरी आत्महत्या करत आहेत, मीठ चोळण्याचे पाप सुरू आहे. खोटारडे सरकार देव पण पाहत आहे. दर्शनाला जाऊन खोट बोलतात, खोटी बोलण्याची भाजपने मशीन फिट केली आहे.
मागासवर्गीय आयोग संदर्भात छेडले असता आयोगावर सरकारचा दबाव आहे, राजीनामा देऊन ते मुक्त होत आहे. कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. महाराष्ट्र अशांत करण्याचे काम जबरदस्ती का करत आहात? असा सवाल पटोले यांनी उपस्थित केला.