तांत्रिक बिघाडामुळे नागपूर मेट्रो सेवेत आज संध्याकाळी व्यत्यय

0

नागपूर(Nagpur) ६ जुलै :- नागपूर मेट्रोच्या सीताबर्डी इंटरचेंज मेट्रो स्टेशन जवळ OHE (ओव्हर हेड इक्विपमेंट) संबंधित झालेल्या तांत्रिक बिघाडामुळे त्या मार्गिकेवरील सेवा आज संध्याकाळी ६.३० ते ७.३० दरम्यान बंद होती. तांत्रिक बिघाडामुळे सेवा बंद पडल्याने नागपूर मेट्रोच्या प्रवाश्यांची गैरसोय झाली. त्यामुळे खापरी आणि ऑटोमोटिव्ह चौक दरम्यान मॅरो मार्गिकेवरील सेवा प्रभावित झाली. बिघाड समजल्यावर नागपूर मेट्रोच्या अधिकाऱ्यांनी तातडीने पाऊले उचलली.

मिहान डेपो येथून कॅटनरी मेंटेनन्स व्हीकल बिघाड झालेल्या ठिकाणी पोचली आणि त्या संबंधी काम सुरु केले. एका तासात डाऊन मार्गिकेवरील मेट्रो सेवा आणि त्या नंतर सुमारे ८ च्या सुमारास अप मार्गिकेवरील सेवा पूर्ववत केली. रात्रौ सुमारे ८.२० पर्यंत दोन्हीही अप आणि डाऊन मार्गिकेवरील मेट्रो सेवा सुरळीत झाली होती. प्रवाश्यांना झालेल्या गैरसोयी करता महा मेट्रो नागपूर दिलगीर आहे.