Nagpur Metro : ६० हजार ते १.१२ लाख पर्यंत प्रवासी संख्या

0
Nagpur Metro : ६० हजार ते १.१२ लाख पर्यंत प्रवासी संख्या

मेट्रोने प्रवास करत गर्दी टाळा व आरामदायक प्रवास अनुभवा

नागपूर (Nagpur) :-  सार्वजनिक वाहतुकीत नागरिकांच्या पसंतीस उतरलेली वाहतूक सेवा म्हणजे नागपूर मेट्रो रेल सेवा. मेट्रो हे वाहतुकीचे सर्वोत्तम, सुलभ, सुविधाजनक, किफायतशीर आणि सुरक्षित साधन आहे. नोकरीपेशा लोकांसाठी, व्यावसायिकांसाठी आणि विशेषतः विद्यार्थ्यांसाठी मेट्रो अत्यंत उपयुक्त ठरत आहे.उल्लेखनीय आहे कि, सप्टेंबर २०२३ रायडरशिप संख्या प्रतिदिवस सरासरी ६० हजार एवढी होती जे कि आता सप्टेंबर २०२४ मध्ये सरासरी १.१० लाख प्रतिदिवस एवढी गाठली आहे. तसेच १ सप्टेंबर ते २४ सप्टेंबर पर्यंत २१७७८०९ नागरिकांनी मेट्रोने प्रवास केला आहे.

वाढत्या रायडरशिप मध्ये प्रामुख्याने विविध घटकांची अंबलबजावनी महा मेट्रोच्या वतीने करण्यात आली ज्यामध्ये मध्ये नागपूर महानगरपालिका फिडर बस सर्विस,ऑटो सेवा,डिजिटल तिकीट प्रणाली, विद्यार्थ्याना मिळणाऱ्या सवलती,महा कार्ड आदी चा समावेश आहे.

रेल्वे स्टेशन जुळले मेट्रोशी : नागपूर मेट्रोने  नागपूर आणि अजनी रेल्वे स्टेशन मेट्रो स्टेशनशी जोडल्यामुळे नागरिकांना याचा मोठ्या प्रमाणात लाभ होत आहे. त्या सोबतच या दोन्ही रेल्वे स्टेशन परिसरात निर्माण कार्य सुरु असल्यामुळे होणारी गर्दी बघता थेट मेट्रोने प्रवास करत सदर रेल्वे स्टेशन पर्यंत प्रवास करीत आहे. नागरिक बाहेरगावी जाण्याकरता रेल्वेने प्रवास करत असतात शहरातील इतर भागातून प्रवासी रेल्वे स्टेशन या ठिकाणी येत असून नागरिकांनी वैक्तिक आणि अन्य साधनापेक्षा मेट्रोने रेल्वे स्टेशन पर्यंत प्रवास करण्यास पसंती दिली आहे.  मुख्य म्हणजे भारतीय रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाश्याना नागपूर रेल्वे स्टेशन येथे उतरताच मेट्रो ट्रेनने प्रवास करता येणे सहज झाले आहे.महा मेट्रोने नागपूर रेल्वे स्टेशनच्या फ्लॅटफॉर्म क्रमांक ८ येथून म्हणजेच संत्रा मार्केटच्या बाजूने मेट्रो स्टेशनला जोडले आहे.ज्यामुळे नागरिकांना सहज पणे मेट्रो स्टेशन परिसरात पोहचुन मेट्रोचा उपयोग करून पुढील यात्रा करणे शक्य होत आहे. दररोज सुमारे ३५००-४००० प्रवासी या स्टेशनवरून प्रवास करीत आहे. तसेच स्टेशन लगतच्या परिसरात अनेक प्रतिष्ठित शासकीय व निमशासकीय कार्यालय, मंदिर, हॉल असल्यामुळे या परिसरात नागरिकांची नेहमीच रहदारी असते सदर मेट्रो स्टेशन मुळे प्रवाश्याना याचा फायदा होत आहे.

बाजारपेठ पर्यंत पोहोचण्याकरिता मेट्रोचा उपयोग : नागपूर शहरातील प्रमुख मार्केट सिताबर्डी, महाल,इतवारी,गांधीबाग याठिकाणी खरेदी करिता मोठ्या संख्येने नागरिक जात असतात त्या ठिकाणी होणारी गर्दी नागरिक अन्य वाहतुकीच्या साधनाचा उपयोग न करता सिताबर्डी इंटरचेंज, अग्रसेन चौक आणि चितार ओळी मेट्रो स्टेशन पर्यंत मोठ्या प्रमाणे प्रवास करत आहे व या स्टेशन मध्ये प्रवासी संख्ये मध्ये देखील दिवसेंदिवस वाढ होत आहे.

मेट्रो स्टेशन पासून नागपूर महानगरपालिका फिडर बस सेवा : दर १० मिनिटांनी प्रवासी सेवा सुरु असून नागरिकांचा कौल हा मेट्रोकडे वाढत आहे. मेट्रो स्टेशन येथून अन्य ठिकाणी जाण्याकरिता फिडर सर्विसच्या रूपात आपली बस सेवा सुरु करण्यात आल्या आहेत. ज्यामध्ये १.) खापरी मेट्रो स्टेशन ते एम्स हॉस्पिटल  २.) खापरी मेट्रो स्टेशन ते डाएटफूड इंटरनॅशनल  ३.) खापरी मेट्रो स्टेशन ते टेक महिंद्रा ४.) खापरी मेट्रो स्टेशन ते डसॉल्ट रिलायंस एरो स्पेस ५.) जयप्रकाश नगर मेट्रो स्टेशन ते जयताळा ६.) जयप्रकाश नगर मेट्रो स्टेशन ते बेसा ७.) एयरपोर्ट मेट्रो स्टेशन ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर इंटरनॅशनल एयरपोर्ट ८.) युनिव्हर्सिटी कॅम्पस ते रहाटे कॉलोनी मेट्रो स्टेशन ९.) कामठी ते मेडिकल चौक (आटोमाटिव्ह चौक आणि चितार ओळी मेट्रो स्टेशन द्वारे) १०.) वायसीसीई कॉलेज ते ब्राह्मणी फाटा (लोकमान्य नगर मेट्रो स्टेशन आणि बंसी नगर मेट्रो स्टेशन द्वारे) ११.) बंसी नगर मेट्रो स्टेशन ते कमिन्स कॉलेज १२.) प्रजापती नगर ते सिम्बॉयसिस इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी

या सोबतच जास्ती जास्त नागरिकांन पर्यंत पोहोचून त्यांच्या समस्या या मेट्रो संवादच्या माध्यमाने सोडविण्याचा प्रयत्न महा मेट्रोच्या वतीने करण्यात येत आहे.शहरात अलीकडच्या काळात रस्ते अपघात झाले आहेत, सुरक्षित आणि सुरक्षित प्रवासासाठी मेट्रोने प्रवास करण्याचे आवाहन महा मेट्रोच्या वतीने नागरिकांना करण्यात येत आहे.त्यासोबतच मेट्रो ट्रेनमध्ये (कुठलेही अतिरिक्त भाडे न घेता) सायकल सोबत घेऊन जाण्याची परवानगी देते हि वस्तुस्थिती विद्यार्थ्यांना लास्ट माईल कनेक्टिव्हिटी देखील सुनिश्चित करते.

Nagpur is famous for
www.nagpur.gov.in 2024
Nagpur which state
NMC Nagpur
NMC Nagpur property tax receipt
Index number for property tax Nagpur
Nagpur in which state in Map
Nagpur map