

NAGPUR नागपूर-खरी राष्ट्रवादी कोणाची यावर निवडणूक आयोगात सुनावणी सुरु असतानाच हा वाद विधिमडळातही रंगत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या याचिकेवर विधान परिषदेने शुक्रवारी राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांना नोटीसा बजावल्या आहेत. दोन्ही गटाच्या सदस्यांना सात दिवसात उत्तर सादर करण्यास सांगण्यात आले आहे.
जयंत पाटील यांच्या याचिकेवर अजित पवार गटाचे आमदार सतीश चव्हाण, आदिती झटकरे, विक्रम काळे, अमोल मिटकरी यांना नोटीस पाठवण्यात आली आहे. शरद पवार गटाच्या जितेंद्र आवड यांच्या याचिकेवरून रामराजे नाईक निंबाळकर यांना नोटीस काढण्यात आली आहे. दरम्यान अजित पवार गटाकडून अमोल मिटकरी यांच्याकडून दाखल याचिकेत एकनाथ खडसे, शशिकांत शिंदे आणि अरुण लाड यांच्या नावाचा समावेश आहे. दोन्ही गटांना नोटीस प्राप्त झाल्यानंतर सात दिवसांमध्ये आपले उत्तर सादर करण्याचा आदेश या नोटीसमधून देण्यात आले आहे. या नोटीसांमध्ये पक्षांतराच्या कारणास्तव सदस्य रद्द करण्यासंबंधीच्या मागण्यांचा उल्लेख आहे.