“लोकसभेचा फॉर्म्युला चर्चेनंतरच ठरणार..”: फडणवीस

0

नागपूर NAGPUR – लोकसभेसाठी महायुतीचा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरल्याची चर्चा सुरु असताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी इन्कार केलाय. लोकसभेच्या जागावाटपाच्या चर्चा अद्याप व्हायच्या असून हे आपण यापूर्वीही स्पष्ट केले असून अद्याप कुठलाही फॉर्म्यूला ठारलेला नसल्याचे सांगताना जो पक्ष ज्या जागा लढलेला आहे, त्या जागा त्याच्याकडे असाव्यात, हा चर्चेचा आधार राहणार असल्याचे फडणवीस म्हणाले. (DCM Devendra Fadnavis on LS Seat sharing Formula in Mahayuti)
फडणवीस म्हणाले की, हा फक्त चर्चेचा आधार असून तो अंतिम निर्णय नाही. त्यात आवश्यक ते बदलही आम्ही आपापसात बोलून करणार आहोत, असेही फडणवीस यांनी स्पष्ट केले. अवकाळी पावसामुळे राज्यात शेतकऱ्यांचे नुकसान झाले असताना त्यांना नुकसान भरपाई मिळणार का, याकडे लक्ष वेधले असता फडणवीस म्हणाले की, अवकाळी पावसाच्या संदर्भात सर्व जिल्हाधिकाऱ्यांना आम्ही सूचना दिल्या आहेत. प्राथमिक आढावा घेऊन नुकसानीचा अहवाल पाठवण्याचे निर्देश दिले आहेत. शेतकऱ्यांना नुकसान झाले तर आपण त्यांना आम्ही मदत करतोच. वेगवेगळ्या ठिकाणी रब्बीची वेगवेगळी स्थिती आहे. काही ठिकाणी कमी तर काही ठिकाणी जास्त नुकसान होईल. जिथे नुकसान होईल, तिथे मदत होणार, असे ते म्हणाले.

शेतकऱ्यांना मदत करण्याची सरकारची भूमिका आहे – फडणवीस

नागपूर – राज्यात अवकाळी पावसाने चिंता वाढविली आहे. अवकाळी पावसा संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना सूचना दिलेल्या आहेत.कुठे किती नुकसान झाले याचा प्राथमिक अहवाल घेऊन पाठवण्याचा सूचना दिल्या आहेत. निश्चितपणे राज्य सरकारची भूमिका कुठल्याही परिस्थितीत शेतकऱ्यांना मदत करण्याची असल्याचे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
फडणवीस म्हणाले, वेगवेगळ्या ठिकाणी रब्बी पीक वेगवेगळ्या स्टेजेसमध्ये आहे, पण जिथे नुकसान होईल त्याठिकाणी सरकार नक्कीच मदत करणार आहे. आमदार अपात्रता प्रकरणी विधानसभा अध्यक्ष सुनावणी
यासंदर्भात मी काहीच बोलू शकत नाही. हे ज्यूडीशियल मॅटर आणि ट्रीब्युनलचा दर्जा त्या सुनावणीला आहे. त्यावर बोलणं योग्य होणार नाही. जागा वाटप बाबतीत मी कालही सांगितले आहे, पुन्हा एकदा स्पष्ट करून सांगतो, अजून आमची याबाबत चर्चा व्हायची आहे, चर्चेनंतरच जागावाटप सूत्र ठरेल.
मात्र त्याचा आधार काय असेल, तर जो ज्या जागांवर लढला आहे, तो साधारणपणे त्या जागा लढवणार
मात्र हे एकदम काटेकोर राहणार नाही, त्यात बदल होऊ शकतात असे स्पष्ट संकेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले