लैंगिक शोषणात नागपूर अग्रेसर

0

लाॅयन्स क्लबच्या कार्यक्रमात गुरसिमरन कौर यांनी उलगडले वास्तव
नागपूर:(Nagpur)
मानवी तस्करी, मुली-मुलांवरील अत्याचार, त्यांचे लैंगिक शोषण याबाबत नागपूर शहर महाराष्ट्रात अग्रेसर असणे ही अतिशय गंभीर बाब आहे.आजची तरुणाई आणि बालक देखील आज मानवी तस्करीच्या जाळ्यात फसत आहेत. एकट्या नागपूर शहरात नागपुरातून दोन‌ हजार मुली गायब झाल्या आहेत. परिणामी मानवी तस्करीचा हा प्रकार दिवसागणिक गंभीर रूप धारण करीत आहे. म्हणूनच यासंदर्भात नवीन पिढीतील सदस्यांनी जागृत राहणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन लाॅयन्स क्लबच्या युवा अभ्यासक गुरसिमरन कौर यांनी येथे केले.

नागपूर येथील काॅंग्रेस नगर स्थित धनवटे नॅशनल काॅलेजची एनएनएस शाखा आणि लाॅयन्स क्लब ऑफ नागपूरच्या वतीने मंगळवारी आयोजित एक जनजागृती कार्यक्रमात त्या बोलत होत्या. लाॅयन्स क्लबचे अध्यक्ष सचिन अग्रवाल, महाविद्यालयाचे प्राचार्य प्रशांत कोठे, आणि एनएनएस विभागाचे प्रमुख डॉ . राजकुमारगिरी गोसावी यांच्या उपस्थितीत या सत्राची सुरुवात झाली.

लाॅयन्स क्लबच्या युवा अभ्यासक गुरसिमरन कौर यांनी या सत्रात आकडे, माहिती, घडलेल्या घटना व प्रात्यक्षिकांसह मानवी तस्करीचा मुद्दा सर्वांगाने विशद करत त्याचे गांभीर्य व जनजागृतीची आवश्यकता देखील स्पष्ट केली.

लाॅयन्स क्लबचे पदाधिकारी विनोद गुप्ता, किशोर भैय्या नरेंद्र कौशिक, राजेश जिंदल, विजय फरकासे, सागर शिवहरे, किशोर कुंजेकर, सुनील कुहीकर, विघ्नेश बिलसे आदी यावेळी उपस्थित होते.