
नागपूर : जामठा येथील विदर्भ क्रिकेट असोसिएशनच्या मैदानावर गुरुवारी भारत आणि इंग्लंड यांच्यात एक दिवसीय क्रिकेटचा सामना होणार आहे. या सामन्यासाठी २ फेब्रुवारीला नागपुरात आलेल्या भारतीय संघाने मंगळवारी मैदानावर घाम गाळत धावपट्टीचा अभ्यास केला. इंग्लंड संघाने रात्री ५ ते ८ या वेळेत धावपट्टीचा अभ्यास केला. आज इंग्लंड संघ दुपारच्या वेळेस सराव करणार आहे, त्यानंतर ४ ते ८ यावेळेत भारतीय संघ या धावपट्टीचा सराव करणार आहे.
सहा वर्षानंतर पहिल्यांदाच शहरात भारत आणि इंग्लड संघात एक दिवसीय क्रिकेट सामना होत आहे. शहरातील वातावरण क्रिकेटमय झाल्याचे दिसून येत आहे.
पीचवर गवत जास्त वाढल्यामुळे रात्रीच्या सुमारास धुके पडल्याने चेंडू लवकर ड्राय होत नाही. मैदानावरील वाढलेले गवत कापण्याचे काम युध्द स्तरावर सुरु झाले आहे. भारतीय संघात अनुभवी खेळाडू आहेत. ते चांगल्या खेळाचे प्रदर्शन करतील. शहरात क्रिकेट या खेळाविषयी चांगले वातावरण आहे. शहरातील क्रिकेटप्रेमी खेळाडूंना प्रोत्साहित करतात, त्यामुळे खेळाडू पुन्हा उत्साहाने खेळतात, अशा शब्दात भारतीय क्रिकेटपटू शुभमन गीलने पत्रकार परिषदेत नागपूरच्या क्रिकेटप्रेमींची प्रशंसा केली.
भारतीय उपकर्णधार शुभमन गिलने म्हटले आहे की, एका मालिकेमुळे संपूर्ण संघाचा फॉर्म ठरवता येत नाही. मंगळवारी नागपूरमध्ये संघाच्या सरावानंतर तो म्हणाला की, संघात असे अनेक खेळाडू आहेत ज्यांनी अनेक स्पर्धा आणि मालिकांमध्ये सातत्याने चांगली कामगिरी केली आहे.
ऑस्ट्रेलियात झालेल्या 5 सामन्यांच्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी मालिकेत भारतीय संघाला 3-1 असा पराभव पत्करावा लागला. या मालिकेत स्टार फलंदाज विराट कोहली, रोहित शर्मा, ऋषभ पंत आणि शुभमन गिल पूर्णपणे अपयशी ठरले.
इंग्लंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी भारतीय संघ रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (यष्टीरक्षक), ऋषभ पंत (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, जसप्रीत बुमराह (तिसरा सामना), हर्षित राणा (सलामीवीर) ) 2 सामने), अर्शदीप सिंग, मोहम्मद शमी आणि वरुण चक्रवर्ती.





















