
देवेंद्र फडणवीसांचा तातडीने आदेश
नागपूर(Nagpur) 17 जून :- नागपुरात पुन्हा एकदा हीट अँड रन प्रकरणाची घटना समोर आली असून यात एका भरधाव इरटीका कार चालकाने रस्त्याच्या कडेला झोपलेल्या मजुरांना अक्षरक्ष: चिरडत नेले आहे.
राज्याची उपराजधानी नागपूरमध्ये हिट अँड रन प्रकरणाचे सत्र सुरूच असल्याचे चित्र समोर आले आहे. त्यामागील कारण म्हणजे दोन दिवसांपूर्वी एक भरधाव कारने रस्त्याच्या कडेला असलेले अनेक वाहने उडवत ही कार थेट दुकानात शिरल्याची घटना घडली होती. यात सुदैवाने कुठलीही जीवितहानी झाली नसली तरी अनेक जण जखमी झाले होते. ही घटना ताजी असताना आता पुन्हा अशीच एक घटना समोर आली आहे. यात फुटपाथवर झोपलेल्या 9 मजुरांना एका भरधाव कारने चिरडल्याचा (Nagpur Accident) धक्कादायक प्रकार पुढे आला आहे.या घटनेत दोन 2 मजुरांचा मृत्यू झाला असून सात जण गंभीर जखमी झाले आहेत. मृतकांमध्ये एका बालकाचा देखील समावेश आहे. ही घटना रविवारच्या रात्री 12 वाजताच्या सुमारास वाठोडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दिघोरी नाक्याजवळ घडली आहे. या प्रकरणी पोलीसांनी आरोपी कारचालकाला अटक केली असून पुढील तपास सध्या पोलीस करत आहेत
वाठोडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दिघोरी नाक्याजवळ हा भीषण अपघाताची घटना घडलीय. यात एका भरधाव इरटीका कार चालकाने रस्त्याच्या कडेला झोपलेल्या मजुरांना अक्षरक्ष: चिरडत नेले आहे. धक्कदायक बाब म्हणजे यातील आरोपीने घटना स्थळावरून पळून जाण्याच्या नादात कारला मागेपुढे केल्याने अपघाताची तीव्रता अधिक वाढली असून यात 2 मजुरांचा मृत्यू झाला असून सात जण गंभीर जखमी झाले आहेत. मृतकांमध्ये एका बालकाचा देखील समावेश आहे. तर यातील सात मजुरांची प्रकुर्ती चिंताजनक असल्याचे सांगितले जात असून त्यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहे.
वाढदिवसाच्या पार्टीसाठी गेलेल्या मद्यधुंद अवस्थेतील सात मित्रांचे कृत्य
या हिट अँड रन प्रकरणात अपघातग्रस्त कारमध्ये भूषण लांजेवार, सौरभ कंडुकर, वंश झाडे, सन्मय पात्रेकर, अथर्व बानाईत, अथर्व मोघरे, आणि ऋषिकेष चौबे हे सात मित्र होते. हे सात हि मात्र वंश झाडे यांच्या वाढदिवसाच्या पार्टीला नागपूरच्या शेरे पंजाब धाब्यावर पार्टी करायला गेले. दरम्यान, कार हि सौरभ कडुकरच्या मालकीची असून पार्टी केल्यानंतर कार भूषण लांजेवारने चालवायला घेतली. हे सर्व 20 ते 22 वयोगटातील तरुण असून वेगवेगळ्या महाविद्यालयात शिक्षण घेत आहेत. सर्व मित्र मद्यधुंद अवस्थेत असतांनाही त्यांनी नागपूरच्या आऊटर रिंग रोड फिरायचा बेत आखला आणि गाडी दिघोरी रोड मार्गे जायचे ठरवले. रविवारच्या रात्री 12 वाजताच्या सुमारास अपघातग्रस्त भागात एक विवाह सोहळा सुरु होता. त्यामुळे तेथे थोडी गर्दी आणि वाहनांची रेलचेल होती.
















