शेतकऱ्याला न्याय मिळेल अशी अपेक्षा – सदाभाऊ खोत

0

 

नागपूर  NAGPUR -पहिल्यांदा मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि दूग्धविकास मंत्री यांचे अभिनंदन करतो. राज्यातल्या दूध उत्पादकाला न्याय देणे अत्यंत गरजेचं आहे. गेली दीड महिना झाले राज्यातला दूध उत्पादक शेतकरी त्याच्या मागण्यासाठी रस्त्यावर आंदोलन करीत आहे.winter session 

शेतकऱ्यांची मागणी आहे की सरकारने जे परिपत्रक काढले आहे दुधाला ३४ रुपये या सरकारने दर दिले आहेत. परंतु महाराष्ट्रातल्या दूध उत्पादकाला २५ रुपये मिळत आहेत
दूध उत्पादकावर हा मोठा अन्याय आहे. आजच्या या बैठकीकडे महाराष्ट्रातल्या दूध उत्पादक शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. किमान ५ रुपये प्रतिलिटर गाईच्या दुधाला अनुदान मिळावं आणि दूध मुक्ती निर्यात व्हावी अशा मागण्या घेऊन शेतकरी लढत आहे आणि आमची अपेक्षा आहे सरकारकडून राज्यातल्या दूध उत्पादक शेतकऱ्याला न्याय मिळेल अशी अपेक्षा सदाभाऊ खोत, रयत क्रांती संघटना यांनी व्यक्त केली.