

नागपूर NAGPUR – चंद्रपूर विमानतळाच्या airport बाबतीत पुनर्विचार व्हावा यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा केला जाईल अशी माहिती भाजपचे ज्येष्ठ नेते, वन, सांस्कृतिक मंत्री Sudhir Mungantiwar सुधीर मुनगंटीवार यांनी दिली. चंद्रपूर हा जिल्हा आदिवासी बहुल आणि मागास जिल्हा आहे.या जिल्ह्यातील ११ तालुके मानव विकासामध्ये येतात. राजूरा विधानसभा क्षेत्रात उद्योग यावेत, पर्यटन तालुक्याचं वाढावे, नक्षलवादाने पुन्हा डोकं काढलं तर, अशावेळी वेगाने कुमक पाठवता यावी यासाठी राज्याचं धोरण लक्षात घेता हे विमानतळ उपयुक्त ठरेल म्हणून केंद्राकडे आम्ही पुनर्विचारासाठी हा प्रस्ताव पाठवणार आहोत असेही सुधीर मुनगंटीवार यांनी स्पष्ट केले.