माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला गेला – अजित पवार

0

 

नागपूर NAGPUR  – पीएचडी संदर्भातील माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला गेला.मी यापूर्वीच दिलगिरी व्यक्त केली असल्याची माहिती माध्यमांशी बोलताना उपमुख्यमंत्री AJIT PAWAR अजितदादा पवार यांनी दिली.
शासकीय कर्मचारी संपावर गेले आहेत ही वस्तुस्थिती असली तरी जुनी पेन्शनबाबत कालच्या बैठकीत संघटनांना संपूर्ण माहिती दिली.
अर्थसंकल्पिय अधिवेशनापूर्वी निर्णय घेतला जाईल.जुन्या पेन्शन योजनेबाबत काल बैठक झाली. मुख्यमंत्री आधी बोलल्यानुसार सकारात्मक असून कर्मचारी संघटनांना संपूर्ण माहिती सांगितली आहे. कांदा, इथेनॉल दूधदर प्रश्न चर्चेसाठी केंद्रीय गृहमंत्री, सहकारमंत्री अमित शहा यांची वेळ मागितली आहे.
दरम्यान, ओबीसी संघटना बैठकीत ठरल्यानुसार सारथी, बार्टी व महाज्योती योजनेसाठी पैसे दिले जातील असेही उपमुख्यमंत्रीअजित पवार यांनी स्पष्ट केले.