NMC : मनपा करणार नागरिकांमध्ये नद्यांबाबतीत जनजागृती

0

वृक्षारोपण, योग, बासुरी वादनासह विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचेही आयोजन

नागपूर (Nagpur), ता. 24: जलशक्ती मंत्रालय जल संसाधन नदी विकास व गंगा संरक्षण विभाग, भारत सरकार यांच्या मार्फत गुरुवार दि.27 फेब्रुवारी रोजी राष्ट्रीय नदी संरक्षण संचालनालय कार्यक्रमाअंतर्गत नागरीकांमध्ये नद्यांबाबत जनजागृती करण्याच्या दृष्टिने अभियान राबविण्यात येणार आहे.

नागरीकांमध्ये नद्यांबाबत जनजागृती या अभियाना अंतर्गत घाट, सार्वजनिक अभीयांत्रीकी स्थळी, उद्यानात योगा प्रात्याक्षिका, मेरॉथॉन स्पर्धा आणि नदीपुजन, नदी काठावर वृक्षारोपण, नदी काठावर पदयात्रा, नद्यांची साफ सफाई, नद्या स्वच्छता अभियान, वृक्षारोपण, नदीचे काठावर आरतीचे आयोजन, याशिवाय चित्रकला स्पर्धा, भिंतीची पेंटींग, निबंध/कथा स्पर्धा, बोट रेसिंग, रांगोळी स्पर्धा, पुस्तक वाचन लोकनृत्य, सांस्कृतिक कार्यक्रम, संगीत, पारंपारिक चित्रकला/ नृत्य पथनाट्य उपक्रम राबविण्यात येणार आहे.

नागपूर महानगरपालिका तर्फे राष्ट्रीय नदी संरक्षण संचालनालयामार्फत घोषित कार्यक्रमाअंतर्गत गुरुवारी शहरातील नागरिकांमध्ये नद्याबाबत जनजागृती वाढावी याकरिता कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. सद्या मनपा मार्फतसद्यास्थिती नद्या सफाई अभियानास सरुवात करण्यात आलेली आहे. गुरुवारी उद्यान विभागातर्फे नदी काठावर व इतर भागात वृक्षारोपण करण्यात येणार आहे. क्रीडा सांस्कृतिक विभागामार्फत सकाळी गोदरेज आनंदम येथे योगा, फुटाळा येथे सायंकाळी बासुरी वादनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. शिक्षण विभागातर्फे पुस्तक वाचन आणि निबंध स्पर्धा , चित्रकला, रांगोळी स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहे.