नागपुरातील बांधकाम व्यावसायिकाची आत्महत्या

0

नागपूरः शहरातील एका नामांकित बांधकाम व्यावसायिकाने आर्थिक ताण-तणावातून आठ मजली इमारतीवरुन उडी घेऊन आत्महत्या केली. ही खळबळजनक घटना आज, रविवारी दुपारी उघडकीस आली. अभिजीत बाबूराव दुधाने (४५) असे मृत बांधकाम व्यावसायिकाचे नाव आहे.

अभिजीत दुधाने हे नामांकित बांधकाम व्यावसायिक आहे. ते गेल्या काही दिवसांपासून तणावात होते. अभिजीत आणि एक राजकीय नेता उद्या सोमवारी एका प्रॉपर्टीचा खरेदी-विक्रीचा सौदा करणार होते. मात्र, त्यांनी आज अचानक आत्महत्या केल्यामुळे त्यांच्या मृत्यूबाबत चर्चेला उधान आले आहे. ते आज दुपारी ऑरबिट सोसायटीच्या आठ मजली इमारतीवर गेले. तेथून त्यांनी उडी घेऊन आत्महत्या केली.