‘या’ एक्स्प्रेस आजपासून एलएचबी डब्यांसह चालणार

0

मुंबई-जबलपुर एक्स्प्रेस आणि काचीगुडा-मनमाड एक्स्प्रेस एलएचबी डब्यांसह चालणार

मुंबई (Mumbai)15 सप्टेंबर रेल्वेने खालील गाड्या एलएचबी कोचने चालवण्याचा निर्णय घेतला आहे.

ट्रेन क्रमांक 12188 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – जबलपूर गरीब रथ दि. ०६.१०.२०२४ पासून आणि

ट्रेन क्रमांक 12187 जबलपूर – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस गरीब रथ दि. ०५.१०.२०२४ पासून.

सुधारित संरचना 12188/12187 साठी: २० वातानुकूलित- तृतीय इकॉनॉमी आणि २ जनरेटर व्हॅन.

ट्रेन क्रमांक 17063 मनमाड – काचीगुडा अजिंठा एक्सप्रेस २.०१.२०२५ पासून आणि

ट्रेन क्रमांक 17064 काचीगुडा – मनमाड अजिंठा एक्सप्रेस दि. ०१.०१.२०२५ पासून.

सुधारित संरचना 17063/17064 साठी : एक प्रथम वातानुकूलित, दोन वातानुकूलित-द्वितीय, पाच वातानुकूलित-तृतीय, ८ शयनयान, ५ जनरल सेकंड क्लाससह १ जनरल सेकंड क्लास कम गार्ड्स ब्रेक व्हॅन आणि एक जनरेटर व्हॅन

आरक्षण : ट्रेन क्रमांक 17063/17064 (दि. २९.१२.२०२४ पासून सेवांसाठी) बुकींग सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि www.irctc.co.in या संकेतस्थळावर सुरू झालेले आहे.

तपशीलवार थांबा आणि वेळेसाठी कृपया www.enquiry.indianrail.gov.in ला भेट द्या किंवा एनटीईएस ॲप डाउनलोड करा.