

(Nagpur)नागपूर -ख्यातनाम कवी आणि थोर स्वातंत्र्य सेनानी सुब्रमनिया भारती यांची जयंती दि.११ डिसेंबर रोजी असून त्यानिमित्ताने ‘भारतीय भाषा दिन’ साजरा करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. सर्वच साहित्य संस्था, सांस्कृतिक संस्था, सामाजिक संस्थांनी हा दिवस साजरा करावा, असे आवाहन करण्यात आले आहे. या आवाहनाला प्रतिसाद देत विदर्भ साहित्य संघाच्या वतीने महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने बहुभाषिक कवी संमेलनाचे सोमवार दि.११ डिसेंबर रोजी सायं ४.३० वाजता विदर्भ साहित्य संघाच्या ‘अमेय दालनात’ आयोजन करण्यात आले आहे.
अध्यक्षस्थानी ज्येष्ठ कवयित्री आशा पांडे राहणार असून शगुफ्ता काझी-उर्दू, नंदा पुरी-संस्कृत, रश्मी पदवाड-मराठी, आवत भागचंदानी-सिंधी, प्रभा मेहता-गुजराती, दिप्ती कुशवाह-हिन्दी आणि रुबी दास बंगाली हे कवी आपल्या रचना सादर करतील. संमेलनाच्या संयोजक डॉ. सुरुची डबीर असून या कवी संमेलनाचे सूत्रसंचालन वृषाली देशपांडे करणार आहेत.