

नागपूर (Nagpur) दि. 11/12/2024 :- देवता लाईफ फाऊंडेशन हया सेवा-भावी संस्थेने 12 वर्षाच्या आतील कॅन्सरग्रस्त मुलांसाठी गोरेवाडा झु येथे दि. 10 डिसेंबर 2024 रोजी सहलीचे आयोजन केले होते. या सहलीमधे मुलांसोबत त्यांचे पालक सुध्दा उपस्थित होते. सहलीला एकुण मुले व पालक मिळून 40 जण उपस्थित होते.
सर्वप्रथम झु मध्ये पोहचल्यानंतर मुलांना हेल्दी नाश्ता देण्यात आला त्यांनतर सर्व कॅन्सरग्रस्त मुलांना व त्यांच्या पालकांना । तासाची जंगल सफारी करण्यात आली. या सफारीमध्ये मुलांनी वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी बघण्यास मिळाले, त्यामुळे मुलांना खुप आनंद झाला. नंतर जेवणाचा आस्वाद घेतला. जेवणानंतर मुलांचे विविध प्रकारचे गेम्स्, डान्स घेण्यात आले. त्यानंतर कॅन्सरग्रस्त मुलांनी आगगाडीत बसून जंगलाची मजा घेतली.
देवता लाईफ फाऊंडेशन तर्फे कॅन्सरग्रस्त मुलांचे दुःख कमी करुन त्यांच्या चेह-यावर आनंद फुलविण्यासाठी त्यांचे वाढदिवस, दसरा, दिवाळी, नाताळ व होळीसारखे परंपरागत सणही तसेच विविध ठिकाणी त्यांच्या मनोरंजनासाठी सहलीचे आयोजन सुध्दा केले जाते.
सहलच्या आयोजनामध्ये संस्थेच्या उपाध्यक्षा कस्तुरी बावणे तसेच देवदुत रश्मी शाहू, अंकीता बाबरे, कमलाकर उज्जैनकर, अमोल जुगनाके, अक्षय मिश्रा या सर्वांचे सहकार्य मिळाले.