
नाशिक , 5 जून : नाशिकच्या येवला येथील प्रांत कार्यालयाच्या समोर शेतकऱ्यांच्या समस्या घेऊन बच्चू कडू यांच्या प्रहार संघटनेच्या वतीने मुंडन आंदोलन करण्यात आले यावेळी केंद्रशासना चा निषेध नोंदविण्यात आला.
येवला तालुक्यातील प्रांत कार्यालयासमोर मागील काही दिवसापासून सातत्याने शेतकऱ्यांना प्रामुख्याने जाणवणाऱ्या समस्या म्हणजे शेतमालाला योग्य भाव नसणे तसेच कांद्याची समस्या देखील मोठ्या प्रमाणावर वाढू लागली आहे . यामुळे शेतकऱ्यांसमोर उत्पादन खर्चही निघत नसल्याच्या कारणामुळे संतप्त झालेल्या बच्चू कडू यांच्या प्रहार संघटनेच्या वतीने प्रांत कार्यालयाच्या आवारात मुंडन आंदोलन करण्यात आले. यावेळी प्रांत कार्यालयात निवेदन देखील देण्यात आले त्यांनी विधानांमध्ये प्रामुख्याने नाफेडमार्फत कांद्याची खरेदी करून उत्पादन मूल्यापेक्षा कमी दर देऊ नये, शेतकऱ्यांना खरीप हंगामाच्या तयारीसाठी शासनाने अनुदान जाहीर करून ते त्वरित द्यावे शेतमाला योग्य भाव द्यावा आधी मागण्या या निवेदनामध्ये करण्यात आले आहे या आंदोलनात तालुका अध्यक्ष हरिभाऊ महाजन युवा गाडीचे तालुकाध्यक्ष सुनील पाचपुते दिव्यांग संघटनेचे अध्यक्ष सोमनाथ खुरासने यांच्यासह सुमारे 15 शेतकरी उपस्थित होते.