

सर्वोदय शिक्षण मंडळाच्या अध्यक्षा श्रीमती सुधाताई शांताराम पोटदुखे यांचे दुःखद निधन
माजी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री शांताराम पोटदुखे (Former Union Minister of State for Finance Shantaram Potdukhe)यांच्या पत्नी तथा सर्वोदय शिक्षण मंडळ चंद्रपूरच्या अध्यक्षा श्रीमती सुधाताई शांताराम पोटदुखे यांचे आज पहाटे नागपूर येथील सेवन स्टार हॉस्पिटल येथे दुःखद निधन झाले.
गेल्या काही दिवसांपूर्वी त्यांना पक्षाघाताचा अटॅक आला होता . त्यांच्यावर नागपूर येथील सेव्हन स्टार हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते . अखेर आज पहाटे त्यांची प्राणज्योत मालवली . त्यांच्या पश्चात मुलगा भरत पोटदुखे मुलगी रीमा , नातवंड व बराच मोठा आप्तपरिवार आहे .
शाम्तर्म पोटदुखे यांच्या निधनानंतर 2 नोव्हेंबर 2018 रोजी त्यांनी सर्वोदय शिक्षण मंडळाच्या अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतलेली होती. तेव्हापासून सर्वोदय शिक्षण मंडळाची एका यशस्वी दिशेने वाटचाल सुरू झाली होती. त्यांच्या अशा अकाली आणि अकस्मात जाण्याने चंद्रपूरच्या शिक्षणाक्षेत्रावर सर्वत्र दुःखद छाया पसरलेली आहे .