श्री.रोहितदादा पवार उद्या चंद्रपूर दौऱ्यावर !

0

राष्ट्रवादीचे नेते युवकांचे लोकप्रिय आमदार श्री.रोहितदादा पवार उद्या चंद्रपूर दौऱ्यावर !

राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते आमदार रोहितदादा पवार (NCP youth leader MLA Rohitdada Pawar)आणि आ.सुनील भुसारा व श्री.रविकांत वर्पे हे उद्या दि.२ एप्रिल रोजी यवतमाळ येथून चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत, सायं ५.३० वा. भद्रावती येथे त्यांचे आगमन होणार आहे ! भद्रावती येथे श्री.मूनाज शेख यांनी आयोजित केलेल्या “इफ्तार पार्टी”ला सायं.६.३० ते ७.३० पर्यंत ते उपस्थित राहणार आहेत. त्यानंतर ७.३० वा.पत्रकार परिषदेला संबोधित करून ते चंद्रपूरकडे रवाना होतील.

दि.३ एप्रिलला सकाळी १० वा.चंद्रपूरहून मुल कडे रवाना होतील ११ ते ११.३० बल्लारपूर विधानसभा राष्ट्रवादी पक्ष कार्यालय मुल येथे पक्ष कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांशी संवाद साधतील,आणि १२.३० वा. चामोर्शी जिल्हा गडचिरोली येथे इंडिया आघाडीचे(काँग्रेस) उमेदवार श्री.नामदेवराव किरसान यांच्या प्रचार सभेला उपस्थित राहणार आहेत.

जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या सर्व प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी भद्रावती येथे सायं.५ वा.उपस्थित राहावे !