

साहेब, गुन्हेगारीवर आढा घाला
चंद्रपू(Chandrapur) ७ जुलै :- चंद्रपूर जिल्हा हा शांतता प्रिय जिल्हा म्हणून ओळखला जातो परंतु अलिकडे गुन्हेगारीच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत चालली आहे. या वाढत्या गुन्हेगारी बद्दल चिंता व्यक्त करीत खासदार प्रतिभा धानोरकर(Pratibha Dhanorkar) यांनी उपमुख्यमंत्री तथा गृह मंत्री देवेंद्रजी फडणवीस(Devendra Fadnavis) यांना पत्र लिहून गुन्हेगारीवर आढा घालण्याची मागणी केली आहे.
चंद्रपूर शहर तसेच जिल्ह्यात अलिकडे मोठ्या प्रमाणात गुन्हेगारी वाढत चालल्याचे चित्र निर्माण झाले आहे. चंद्रपूर शहरातील रघुवंशी कॉम्प्लेक्स येथे मनसे च्या पदाधिकाऱ्यावर गोळ्या घालुन जखमी केल्याची घटना ताजी असतांनाच बल्लारपूर येथे जुन्या वैमनस्यातून गोळीबार करुन पेट्रोल बॉम्ब फेकत व्यापाऱ्यावर भ्याड हल्ल्यात एक जखमी झाला. या एकदिवसाआधीच वडील आणि मुलाने मिळून शेजाऱ्याची निघृन हत्या केली. मागील एका वर्षात गुन्हेगारीचे अनेक प्रकरण समोर येत आहे. या सर्व बाबींवर खासदार प्रतिभा धानोरकर यांनी चिंता व्यक्त केली. त्यांसदर्भात उपमुख्यमंत्री तथा गृह मंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना पत्र लिहून गुन्हेगारीवर तात्काळ आढा घालण्याची मागणी केली आहे. चंद्रपूर jजिल्ह्यात सतत होणाऱ्या घटनांवर आढा न घातल्यास भविष्यात गुन्हेगारीचा उद्रेक निर्माण होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची भिती खासदार धानोरकर यांनी व्यक्ती केली. यासंदर्भात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन या विषयासंदर्भात चर्चा करणार असल्याचे देखील सांगितले