नागपूर : नागपूर शहरासह संपूर्ण विदर्भातील खेळाडूंसाठी महत्वाचे व्यासपीठ ठरलेल्या १३ दिवसांपासून सुरू असलेल्या खासदार क्रीडा महोत्सवाचा रविवारी २२ जानेवारी रोजी सायंकाळी समारोप होत आहे. यशवंत स्टेडियम येथे होणा-या कार्यक्रमात खासदार क्रीडा महोत्सव क्रीडा महर्षी पुरस्कार द्रोणाचार्य आणि छत्रपती पुरस्कार विजेते विजय मुनीश्वर यांना प्रदान करण्यात येणार असल्याची घोषणा खासदार क्रीडा महोत्सवाचे प्रणेते केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केली. यावेळी खासदार क्रीडा महोत्सवाचे संयोजक माजी महापौर संदीप जोशी, सुधीर दिवे, महोत्सवाचे सचिव डॉ. पीयूष आंबुलकर, विजय (पिंटू) झलके, सतीश वडे आदी उपस्थित होते.
यावेळी क्रीडा महर्षी आणि क्रीडा भूषण पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. कार्यक्रमात सुप्रसिद्ध पार्श्वगायक अंकित तिवारी यांचे लाईव्ह कॉन्सर्ट आणि डब्ल्यूडब्ल्यूई मधील वर्ल्ड हेवी वेट चॅम्पियन ग्रेट खली यांची विशेष उपस्थिती असेल, अशीही माहिती यावेळी गडकरी यांनी दिली.
आज खासदार क्रीडा महोत्सवाचा समारोप, अंकित तिवारी, खली आकर्षण
MAHARASHTRA
MAHARASHTRA
Breaking news












