MP Cup : आंतरशालेय समूहगीत स्पर्धेची अंतिम फेरी 17 ऑगस्‍ट रोजी

0

केंद्रीय मंत्री मा. श्री. नितीन गडकरी यांची उपस्‍थ‍िती

नागपूर (Nagpur) 16 ऑगस्‍ट :- बाल कला अकादमी व स्त्री शिक्षण प्रसारक मंडळ नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित खासदार चषक आंतरशालेय विद्यार्थी देशभक्ती समूहगीत स्पर्धेची अंतिम फेरी शनिवार, 17 ऑगस्‍ट 2024 रोजी सुरेश भट सभागृह, रेशीमबाग सकाळी 9 वाजता होणार आहे.

गट ‘अ’ व गट ‘ब’ अशा दोन गटात झालेल्‍या या स्‍पर्धेत अ गटातून अंतिम फेरीसाठी निवड झालेल्या शाळांमध्‍ये नारायणम् विद्यालय कोराडी, स्वामीनारायण विद्यालय वर्धमान नगर, (MP Sports Festival) स्कूल ऑफ स्कॉलर्स बेलतरोडी, माऊंट लिटरा झी स्कूल वडधामना, टी ब्रांन्स बी. आर. मुंडले इंग्लिश मिडीयम स्कूल, इसेन्स इंटरनॅशनल स्कूल वडधामना, संस्कार विद्यासागर दिघोरी, संस्कार विद्यासागर नंदनवन, सेवासदन सक्षम,स्कूल ऑफ स्कॉलर्स वानाडोंगरी यांचा समावेश आहे. तर गट ‘ब’ मध्‍ये आर. एस‌. मुंडले, मॉर्डन स्कूल कोराडी, स्कूल ऑफ स्कॉलर बेलतरोडी, सोमलवार हायस्कूल रामदासपेठ, सोमलवार निकालस, नारायणा विद्यालय चिचभवन, अस्पायर इंटरनॅशनल, सेवासदन सक्षम, बच्छराज व्यास, भवन्स सिव्हिल लाईन, श्रीमती दादीबाई देशमुख हिंदू मुलींची शाळा, सेंट वीसेंट पलोटी स्कूल यांचा समावेश आहे.

पारितोषिक वितरण कार्यक्रमाला प्रमुख अतिथी महाराष्ट्र राज्य माध्यमिक, उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्‍या अध्यक्ष माधुरी सावरकर, दैनिक तरुण भारतचे माजी संपादक विवेक घळसासी यांची उपस्‍थ‍िती राहणार असून कार्यक्रमाच्‍या अध्यक्षस्थानी असलेले केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते बक्षीस वितरणाचा सोहळा होणार आहे.
स्पर्धेतील स्पर्धकांना प्रोत्साहन देण्यासाठी जास्तीत जास्त संख्‍येने उपस्थित राहावे, असे आवाहन स्त्री शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष रवींद्र फडणवीस व बालकला अकादमीचे अध्यक्ष मधुरा गडकरी यांनी केले आहे.