


खासदार अमर काळे यांनी दिली शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटूंबाच्या घरी भेट
वर्धा : हिंगणघाट तालुक्यातील सावली (वाघ) येथील शेतकरी संजय पुंडलीक ठक यांनी शेतीच्या कर्जाच्या ओझ्यामुळे व शेतात होत असलेल्या सततच्या नापीकीच्या संकटाला कंटाळून आत्महत्या केली. सदर बाब खासदार अमर काळे यांच्या कानावर जाताच त्यांनी हिंगणघाट येथील आपल्या दौऱ्यातून वेळ काढून सावली (वाघ) येथे संजय पुंडलीक ठक यांचे घरी भेट देऊन कुटूंबाचे सांत्वन केले. खासदार अमर काळे यांनी ठक यांच्या कुटूंबातील प्रत्येकाशी व्यक्तीशः चर्चा करुन त्यांच्यावर कोसळलेल्या संकटातून त्यांना सांत्वनाद्वारे बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. संजय ठक यांची मुलगी व मुलगा महाविद्यालयात शिक्षण घेत असून कुटूंबाचा संपूर्ण गाडा हा शेतीवरच अवलंबून आहे. सततची नापीकी शेतमालाचे पडलेले भाव उत्पादन खर्चावर आधारीत पिकाला भाव मिळत नसल्याने घेतलेल्या कर्जाची परतफेड सुध्दा शेतीतून करता येत नाही. उलट मुलांच्या महाविद्यालयीन शिक्षणाचा खर्च कुटूंबाच्या दैनंदीन गरजा व शेतीच्या उचललेल्या खाजगी बँकांच्या कर्जाच्या परतफेडीसाठी सततचा तगादा या सर्व गोष्टींना कंटाळून श्री. संजय ठक यांनी आत्महत्ये सारखे पाऊल उचलले. भारतात शेतकरी हा देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा समजल्या जातो. परंतु हल्लीच्या काळात हा शब्दप्रयोग कागदावर लिहीणे व वाचण्यापुरताच याचे महत्व आहे. प्रत्यक्षात वास्तविकता वेगळीच आहे. अशी खंत खासदार अमर काळे यांनी व्यक्त केली. शेतकरी कर्जाच्या ओझ्यापायी अतिवृष्टीने कुटूंबाच्या दैनंदीन गरजा भागवण्यापोटी मुलांचे शिक्षण या विवंचनेतूनच आत्महत्या सारखे विचार शेतकऱ्यांच्या मनात येतात. एवढ्या शेतकरी आत्महत्या होत असतांना सुध्दा सरकार मात्र तुटपुंजी मदत ज्यातून शेतकरी कुटूंबाचा एक महिन्याचा खर्च सुध्दा भागवीला जाऊ शकत नाही. एवढी अल्पशी मदत केवळ घोषित केली. शेतकऱ्यांच्या पदरात केव्हा पडेल हे ज्योतिषी सुध्दा सांगू शकत नाही.
यावेळी खासदार अमर काळे यांच्या सोबत राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे नवनियुक्त अध्यक्ष श्री. अतुलभाऊ वांदीले, मावळते अध्यक्ष श्री. सुनिलभाऊ राऊत, श्री. बालु वानखेडे, श्री. डोंगरे महेशभाऊ झोटींग, श्री. दशरथ ठाकरे यांचेसह गावकरी मंडळी उपस्थीत होते.