

बुलढाणा(Buldhana): राज्यात महाराष्ट्र दिन व कामगार दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. त्यानिमित्ताने आज बुलढाण्यात कामगार दिन त्यानिमित्त बुलढाणा जिल्हा मजदूर संघाच्या वतीने आज मोटर सायकल रॅली काढण्यात आली. ही रॅली शहरातील प्रमुख मार्गाने भ्रमण करत या रॅलीचा समारोप पुन्हा मजूर कामगार संघटनेच्या कार्यालयासमोर करण्यात आला आहे. या रॅलीमध्ये बुलढाणा शहरातील विविध क्षेत्रात काम करणारे कामगार रॅलीत सहभागी झाले अशी माहिती मधुकर जोगदंड, संस्थापक अध्यक्ष, बुलढाणा जिल्हा मजदूर संघटना यांनी दिली.