तीन रात्री चंद्र पौर्णिमे सारखा दिसणार !

0

१९ ऑगस्ट ला सुपरमून – ब्लू मून
१९ ऑगस्ट २०२४ रोजी रक्षाबंधनाच्या रात्री भारतातून सुपरमून आणि ब्लू मून दिसणार आहे.पुन्हा अश्या प्रकारची पोर्णिमा मार्च २०३७ मध्ये दिसणार आहे. सुपरमून म्हणजे चंद्राचे पृथ्वीजवळ येणे आणि चंद्राचा आकार मोठा दिसणे तर ब्लू मून म्हणजे एकाच महिन्यातील दुसरी किंवा एका मौसमातील चार पौर्णिमेपैकी तिसरी पोर्णिमा, होय.ह्यामुळे रक्षाबंधनाच्या पौर्णिमेला चंद्र मोठा आणि प्रकाशमान दिसेल,विशेष म्हणजे कधी कधी दोन रात्री पूर्ण दिसणारा चंद्र ह्या वेळेस १८,१९,२० ऑगस्ट च्या तीन रात्री कमी-जास्त फरकाने पूर्णचंद्र दिसेल अशी माहिती खगोल अभ्यासक आणि स्काय वाच ग्रुप चे अध्यक्ष सुरेश चोपणे ह्यांनी दिली.

सुपरमून- . अमेरिकन आदिवासी ऑगस्ट च्या पौर्णिमेला स्टर्जन मून असे सुधा संबोधतात तर भारत्तात श्रावन पौणिमा आणि राखी पौर्णिमा असे म्हणतात .ज्या पौणिमेला चंद्र पृथ्वीच्या जवळ असेल त्या पौर्णिमेला सुपरमून म्हणतात. चंद्राचा पृथ्वी सभोवतीचा भ्रमण मार्ग हां वर्तुळाकार नसून अंडाकृती असल्यामुळे चंद्र दूर आणि जवळ येत असतो.सर्वाधिक जवळ येण्याला पेरीघी तर दूर जाण्याच्या बिंदुला अपोघी असे म्हणतात,परंतु वर्षातून दोन ते तीन पोर्णिमा ह्या चंद्र जवळ येत असताना होते. १९ रोजी पौर्णिमेला चंद्र पृथ्वी पासून ३,६७,३७२ किमी अंतरावर असेल. विशेषता जेव्हा चंद्र ९० % पृथ्वीजवळ असेल तरी त्या पौर्णिमेला सुपरमून म्हणतात ह्या सुपरमून’ वेळी लघुचंद्रापेक्षा (micro moon) ३० % प्रकाशमान आणि १४ % मोठा दिसेल असा अंदाज आहे. २०२४ मध्ये एकूण ४ सुपरमून दिसणार असून १९ तारखेचा हा त्यातील पहिला सुपरमुन असेल.,उर्वरित सुपरमून हे,१७ सप्टेंबर (चंद्रग्रहण),१७ ऑक्टोंबर आणि १५ नोव्हेबर रोजी दिसेल.

ब्लू मून – म्हणजे चंद्र निळा दिसतो असे नसून एका मौसमातील एकूण ४ पौर्निमेपैकी तिसरी पौर्णिमा ही ब्लू मून असते.त्याला सिझनल ब्लू मून म्हणतात. १९ ऑगस्ट चा ब्लू मून हा सिझनल ब्लू मून आहे.त्याच प्रमाणे ब्लू मून ची दुसरी व्याख्या म्हणजे एकाच महिन्यातील दुसरी पौर्निमा होय , ह्याला मंथली ब्लू मून म्हणतात .ह्या महिन्यात एकच पोर्णिमा असली तरी ती मौसमातील तिसरी पौर्णिमा आहे,म्हणून तिला ब्लू मून असे म्हणतात. पावसाळ्यात वातावरणातील बदलामुळे क्वचित चंद्र हा निळा दिसू शकतो.

बहुतेक वेळा सुपरमून आणि ब्लू मून एकाच वेळेस येत नाही .दर वर्षीच तीन ते चार सुपरमून होत असतात,परंतू सुपरमून आणि ब्लू मून एकाच वेळेस येण्याची घटणा दोन ते तीन वर्षातून एकदा घडते,म्हणून ह्या घटनेला महत्व आहे.पुढे अशी घटना ही जानेवारी आणि मार्च २०३७ मध्ये घडणार आहे.ह्या वेळेसच्या सुपरमून-ब्लू मून चे वेगळेपण म्हणजे अगदी असा योग बहुदा १० वर्षाने येतो परंतु ह्या वेळेस हा योग २० वर्षाने येत आहे तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे ह्यावेळेची पौणिमा जरी एकांच दिवसाची असली तरी चंद्राचा कमी-अधिक पूर्ण आकार तीन दिवस दिसणार आहे १८ तारखेला चंद्राचा ९८ %, १९ तारखेला १००% तर २० तारखेला ९९ % भाग प्रकाशमान दिसेल .१९ तारखेला रक्षा बंधनाच्या दिवशी चंद्र कुंभ राशीत असून विदर्भातून संध्याकाळी ६.३५ वाजता चंद्रोदय होईल आणि सकाळी ६.०८ वाजता चंद्रास्त होईल.पौर्णिमेला दुर्बिनितून चंद्र पाहण्याची गरज नसल्याने चंद्रपूर येथे निरीक्षण शिबीर आयोजित केले जाणार नाही. सध्या पावसाळा असल्याने काही ठिकाणी आकाश ढगाळ असण्याची शक्यता आहे,परंतु ज्या भागात आकाश निरभ्र असेल तिथे हा सुपरमून-ब्लूमून पाहण्याची संधी घ्यावी असे आवाहन स्काय वाच ग्रुप तर्फे करण्यात येत आहे.

दि-१७ /८/२०२४ प्रा सुरेश चोपणे
खगोल अभ्यास (Prof. Suresh Chopane
Astronomy)

अध्यक्ष-स्काय वाच ग्रुप