monsoon session of legislature विरोधकांच्या आंदोलनाला शरद पवार गटाच्या आमदारांनी मारली दांडी

0

मुंबई-Mumbai-  विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या  monsoon session of legislature पहिल्याच दिवशी विरोधकांनी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करीत विधिमंडळाच्या पायऱ्यांवर आंदोलन केले. या आंदोलनात उद्धव ठाकरे uddhav thackeray गट व काँग्रेसचे आमदार सहभागी झाले असताना Sharad Pawar शरद पवार गटाच्या आमदारांची अनुपस्थिती चर्चेचा मोठा विषय ठरली. त्यामुळे राजकीय वर्तुळात वेगळीच चर्चा सुरु झाली आहे. शरद पवारांची भूमिका तरी काय आहे? यावर पुन्हा राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाल्या आहेत. (Legislative Assembly Session)

विधानसभेचे कामकाज सुरु होण्यापूर्वी ठाकरे गट व काँग्रेसच्या आमदारांनी विधान भवनाच्या पायऱ्यांवर जोरदार घोषणाबाजी केली. घटनाबाह्य कलंकित सरकारचा निषेध असो, खोके सरकार हाय हाय, अशी जोरदार घोषणाबाजी आमदारांनी केली. ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे, अंबादास दानवे तसेच काँग्रेसच्या वतीने बाळासाहेब थोरात, वर्षा गायकवाड हे प्रमुख नेते आमदारांसह आंदोलनात सहभागी झाले होते. या आंदोलनात राष्ट्रवादीतील शरद पवार गट सहभागी होईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत होती. मात्र, शरद पवार गटाचा एकही आमदार या आंदोलनाकडे फिरकला नाही. तर दुसरीकडे विरोधकांच्या बंगळुरु बैठकीला शरद पवार हे उपस्थित राहणार नसल्याच्या बातमीमुळे पुन्हा एकदा शरद पवारांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह लागलेले आहे.