संघाच्या विजयादशमी सोहळ्यात सरसंघचालकांनी व्यक्त केली चिंता

0
mohan bhagwat, nagpur, vijayadashami
mohan bhagwat, nagpur, vijayadashami

नागपूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी नागपुरात आयोजित दसरा कार्यक्रमात संबोधित करताना कोलकाता येथील आरजी कार मेडिकल कॉलेजमध्ये झालेल्या बलात्कार प्रकरणावर वक्तव्य केले आहे. याबाबत लवकरात लवकर कार्यवाही करण्याची मागणी त्यांनी केली. बंगालच्या ममता सरकार आरोपींना संरक्षण देत असल्याचा आरोपही संघ प्रमुखांनी केला. यावेळी सरसंघचालक डॉ.मोहन भागवत यांनी देशात जातीपातीच्या आधारावर निर्माण होत असलेले भेद व त्यामाध्यमातून अराजकता पसरविण्याच्या प्रयत्नांवर चिंता व्यक्त केली. (mohan bhagwat, nagpur, vijayadashami)

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्थापनेला शनिवारी ९९ वर्ष पूर्ण झाले व संघाने शताब्दी वर्षात पदार्पण केले. रेशीमबाग येथे शनिवारी विजयादशमी व शस्त्रपूजन उत्सवाचे उत्साहात आयोजन करण्यात आले. सरसंघचालक मोहन भागवत यांनी आज विजयादशमीच्या मुहूर्तावर नागपुरात शस्त्रपूजन केले. त्यापूर्वी स्वयंसेवकांनी पथसंचलन केले. या कार्यक्रमाला इस्त्रोचे माजी अध्यक्ष के. राधाकृष्णन हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूर महानगर संघचालक राजेश लोया यांनी केले. विजयादशमीच्या कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे संघाच्या गणवेशात उपस्थित होते. याशिवाय राष्ट्रसेविका समितीच्या प्रमुख संचालिका शांताक्का, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हेदेखील उपस्थित होते.

 

 

यावेळी ते म्हणाले, बांगलादेशमधील हिंदू समाजावर झालेले हल्ले हा गंभीर प्रकार होता. तेथील हिंदू समाज एकत्रितपणे समोर आला म्हणून काही प्रमाणात त्यांचा बचाव झाला. मात्र जोपर्यंत तेथील अत्याचारी कट्टरपंथीय लोक सक्रिय आहेत तोपर्यंत हिंदूंसोबत अल्पसंख्यांक समाजावर सातत्याने धोक्याची तलवार लटकत राहणार आहे. भारत सरकारने तेथील हिंदूंच्या मदतीसाठी सातत्याने पुढाकार घ्यायला हवा. तेथे भारताचा सामना करण्यासाठी पाकिस्तानसोबत हातमिळावणी करण्याच्या गोष्टी होत आहेत. जगातील काही देश हे प्रयत्न करत आहेत. यावर शासनाने लक्ष दिले पाहिजे. भारतातदेखील अवैध घुसखोरी सुरू असून त्यामुळे लोकसंख्येचे असुंतलन निर्माण होत असून ही गंभीर बाब आहे. दुर्बल राहणे हा अपराध आहे. त्यामुळे हिंदू समाजाने संघटित होत सशक्त होणे ही काळाची गरज आहे, असे डॉ.भागवत म्हणाले.

यावेळी सरसंघचालकांनी पश्चिम बंगालमधील अत्याचाराच्या घटनेवर भाष्य केले. कोलकात्याच्या आर.जी. कार हॉस्पिटलमध्ये घडलेली घटना ही संपूर्ण समाजाला कलंकित करणाऱ्या अशा घटनांपैकी एक आहे. अशा निंदनीय घटनेचा निषेध आणि त्वरित, संवेदनशील कारवाई करावी या मागणीसाठी संपूर्ण समाज वैद्यकीय क्षेत्रातील बांधवांच्या पाठीशी उभा राहिला. पण एवढा  गुन्हा घडल्यानंतरही गुन्हेगारांना संरक्षण देण्यासाठी काही लोकांकडून जे घृणास्पद प्रयत्न केले गेले त्यातून गुन्हेगारी, राजकारण आणि दुष्कृती यांची सांगड आपल्याला कशी बिघडवत आहे, हेच दिसून येते, या शब्दांत त्यांनी पश्चिम बंगाल सरकारवर अप्रत्यक्ष टीकास्त्र सोडले.

देशातील विविधतेला तोडण्याचे व फुटीरवाद तसेच असंतोष निर्माण करत अराजकता निर्माण करण्याचेदेखील प्रयत्न सुरू आहेत. काही घटकांच्या असंतोषाला हवा देऊन तो घटक समाजापासून वेगळा आणि व्यवस्थेविरुद्ध आक्रमक बनवला जात आहे. त्यानंतर व्यवस्था, कायदा, शासन, प्रशासन इत्यादींबद्दल अविश्वास आणि द्वेष वाढवून अराजकता आणि भीतीचे वातावरण निर्माण करण्यात येत आहे. काही लोक यासाठी राजकारणाचा उपयोग करत आहेत. देशहितापेक्षा स्वार्थाच्या राजकारणाला जास्त प्राधान्य देण्यात येत आहे. पर्यायी राजकारणाच्या नावाने आपली विनाशकारी कार्यसूची पुढे नेणे ही त्यांची कार्यपद्धती आहे. अनेक देशांमध्ये असे प्रकार घडले आहेत. भारतातदेखील सीमेवरील भाग तसेच आदिवासी लोकसंख्या असलेल्या भागात असे प्रकार जास्त दिसून येत आहेत. ‘डीप स्टेट’, ‘वोकिज़म’, ‘कल्चरल मार्क्सिस्ट’ असे शब्द सध्या चर्चेत आहेत. किंबहुना हे सर्वच सांस्कृतिक परंपरांचे घोषित शत्रू आहेत, असे देखील सरसंघचालक म्हणाले.

मोबाईलच्या वापरावर लक्ष ठेवायला हवे
आजच्या युगात लहान मुलांच्या हातातही मोबाईल पोहोचला आहे. मात्र मुले काय पाहत आहेत याकडे पालकांचे लक्ष नसते. त्यातून अनेकदा सभ्यतेचे उल्लंघन होते व विकृती वाढते. त्यामुळे मोबाईलच्या वापरावर लक्ष ठेवायला हवे, असे सरसंघचालकांनी प्रतिपादन केले.


संघ के विजयादशमी समारोह में सरसंघचालक ने व्यक्त की चिंता

कॉलेज में हुए बलात्कार मामले पर वक्तव्य

बच्चों के मोबाइल के उपयोग पर ध्यान दें

नागपुर में विजयादशमी और शस्त्रपूजन उत्सव

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ के सरसंघचालक मोहन भागवत ने नागपुर में आयोजित दशहरा कार्यक्रम में कोलकाता के आरजी कार मेडिकल कॉलेज में हुए बलात्कार मामले पर वक्तव्य दिया है। इस संबंध में जल्द कार्रवाई करने की मांग उन्होंने की। बंगाल की ममता सरकार पर आरोप लगाया कि वह आरोपियों को संरक्षण दे रही है। इस अवसर पर सरसंघचालक डॉ. मोहन भागवत ने देश में जाति के आधार पर फैल रहे भेदभाव और इसके माध्यम से अराजकता फैलाने के प्रयासों पर चिंता व्यक्त की।

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ की स्थापना को शनिवार को 99 वर्ष पूरे हुए और संघ ने शताब्दी वर्ष में प्रवेश किया। रेशीमबाग में शनिवार को विजयादशमी और शस्त्रपूजन उत्सव का आयोजन धूमधाम से किया गया। सरसंघचालक मोहन भागवत ने आज विजयादशमी के मौके पर नागपुर में शस्त्रपूजन किया। इससे पहले स्वयंसेवकों ने पथसंचलन किया। इस कार्यक्रम में इसरो के पूर्व अध्यक्ष के. राधाकृष्णन मुख्य अतिथि के रूप में उपस्थित थे। कार्यक्रम का प्रारंभिक भाषण राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपुर महानगर संघचालक राजेश लोया ने दिया। विजयादशमी के कार्यक्रम में केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस संघ की वर्दी में उपस्थित थे। इसके अलावा राष्ट्रसेविका समिति की प्रमुख संचालिका शांताक्का, भाजपा के प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे भी उपस्थित थे।

इस अवसर पर उन्होंने कहा, “भारत में भी अवैध घुसपैठ जारी है, जिससे जनसंख्या का असंतुलन पैदा हो रहा है, यह गंभीर बात है। कमजोर रहना अपराध है। इसलिए हिंदू समाज को संगठित होकर सशक्त होना आवश्यक है,” ऐसा डॉ. भागवत ने कहा।

उन्होंने पश्चिम बंगाल में हुई अत्याचार की घटनाओं पर भी टिप्पणी की। कोलकाता के आरजी कार अस्पताल में हुई घटना समाज के लिए एक कलंक है। ऐसी निंदनीय घटनाओं का विरोध और त्वरित, संवेदनशील कार्रवाई की मांग के लिए पूरा समाज चिकित्सा क्षेत्र के बंधुओं के साथ खड़ा है।

आज के युग में बच्चों के हाथों में भी मोबाइल पहुंच गया है। लेकिन बच्चे क्या देख रहे हैं, इस पर माता-पिता का ध्यान नहीं होता। इससे अक्सर सभ्यता का उल्लंघन होता है और विकृतियाँ बढ़ती हैं। इसलिए मोबाइल के उपयोग पर ध्यान रखना चाहिए, ऐसा सरसंघचालक ने कहा।