

अमरावती(Amravati) – ज्या पद्धतीने गोष्टी एडिट करून विरोधकांकडून बातमी चुकीची दाखवण्याचा प्रयत्न केला जात आहे, त्यांना माझे सांगणे आहे की, या देशामध्ये या देशाची जनता मोदी यांच्यासोबतच राहणार आहे असा विश्वास भाजप उमेदवार नवनीत राणा यांनी व्यक्त केला. माझ्यापुढे जे उमेदवार आहेत ते भाजपचे उमेदवार म्हणून आज अमरावतीमध्ये मोदींच्या नावाने सगळ्यांकडे जात आहेत, त्यांना मोदींचा नमस्कार सांगत आहेत, विकासकाम आम्ही सांगत आहोत. पूर्ण देशात कोणतेही विरोधक यांच्यासमोर नाही, तर मोदींची हवा होती, आहे आणि राहील. देशाच्या प्रगतीसाठी मोदी हे आवश्यक आहेत. आणि अबकी बार ४०० पार आणि नरेंद्र मोदी पुन्हा एकदा २०२४ मध्ये प्रधानमंत्री होणार आहेत. विरोधक काहीना काही करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांना मला सांगायचं आहे की, बावनकुळे हे आमचे नेते आहेत. मी जे वक्तव्य केलं ते अचलपूर मतदारसंघातील आमदार यांच्यासाठी होते. विरोधकांनी हे करण्यापेक्षा लोकांच्या हितासाठी आपण बोललं पाहिजे असेही नवनीत राणा म्हणाल्या.