वाजपेयींचे स्वप्न मोदींनी पूर्ण केले: फडणवीस

0

 

(Pune)पुणे: “राम मंदिर तुमची खासगी संपत्ती आहे का? असे आज काही लोक विचारतात. हेच
लोक पूर्वी ‘मंदिर वही बनायेंगे लेकीन तारीख नहीं बताएंगे’ असा उपहास करायचे. पण तुमच्या छातीवर चढून त्या ठिकाणी मंदिरही बनतेय आणि तारीखही ठरली आहे. २२ जानेवारीला हिंमत असेल तर अयोध्येमध्ये या. तुम्हालाही रामाचं मंदिर काय आहे हे दाखवू. अटलजींचं स्वप्न मोदींनी पूर्ण केलय”, या शब्दात
(Deputy Chief Minister Devendra Fadnavis)उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज काँग्रेसचा समाचार घेतला.

पुण्यातील अटल संस्कृती गौरव पुरस्कार सोहळ्यात फडणवीस बोलत होते. देशात किमान समान कार्यक्रमावर चालणारे वाजपेयी यांच्या नेतृत्वातील सरकार असताना काँग्रेसचे लोक त्यांना राम मंदिर आणि कलम ३७० बद्दल प्रश्न विचारायचे. त्यावेळी वाजपेयींनी आमचे पूर्ण बहुमताचे सरकार आल्यावर या गोष्टीही साकार होतील, असे म्हटले होते. ज्या क्षणी मोदींच्या नेतृत्त्वात सरकार तयार झाले, पूर्ण बहुमत मिळालं, तेव्हा कलम ३७० ही गेलं आणि २२ तारखेला राम मंदिराचं उद्घाटन होत आहे”, याकडे फडणवीस यांनी लक्ष वेधले.