

नागपूर(Nagpur) -नागपूरच्या मुक्कामानंतर नांदेडकडे रवाना होण्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शहरातील सहाही विधानसभा अध्यक्षांशी विमानतळावर चर्चा केली. निवडणुकीचे गणित समजून घेतले. कमी मतदानावर चिंता व्यक्त करीत कारणे जाणून घेतली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागपूर विमानतळावर संघटना विस्तारकांशी संघटनात्मक चर्चा केली.
विशेषत: नागपुरात पहिल्या टप्प्यातील मतदान संपल्यानंतर जनतेचा कौल जाणून घेण्यासाठी ही चर्चा महत्वाची ठरली अशी प्रतिक्रिया पदाधिकाऱ्यांनी दिली. राजभवन येथून विमानतळावर आल्यावर सर्वांची ओळख करून दिल्यावर पंतप्रधानांनी सर्वांना जवळ बोलावून नागपुरातील निवडणुकीची माहिती घेतली आणि पुढच्या निवडणुकीसाठी कुठे पाठवले जात आहे, असे विचारले. पंतप्रधानांशी चर्चेत कमी मतदान संदर्भात
मतदार यादीतील अनियमिततेचाही परिणाम झाला, हजारो मतदारांकडे मतदार कार्ड असूनही त्यांची नावे मतदार यादीत नव्हती, शहरातील अनेक मतदान केंद्रांवर ईव्हीएम अत्यंत संथ गतीने काम करत होत्या आणि 19 एप्रिल रोजी नागपुरात 41.4 अंश सेल्सिअस तापमान होते मतदार बाहेर पडले नाहीत याकडेही लक्ष वेधण्यात आले. याप्रसंगी शहर भाजपचे सरचिटणीस गुड्डू त्रिवेदी, ब्रिजेश शुक्ला, संजय बंगाळे, किशन. गावडे, मुरली नागपुरे विस्तारक सुबोध आचार्य, ब्रजभूषण शुक्ल, मुरलीधर नागपुरे, राम मुंजे, विनोद कडू, देवेंद्र काटोलकर, संतोष यादव, सरचिटणीस विलास त्रिवेदी, संजय ठाकरे, सौ.वर्षो ठाकरे आदींची उपस्थिती होती.