

राजनाथ, शहा, गडकरी, जयशंकर, सीतारामन यांनी घेतली शपथ
नरेंद्र मोदी यांनी रविवारी संध्याकाळी सलग तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली. ते नेहरूंनंतरचे दुसरे पंतप्रधान ठरले आहेत. मोदींनंतर राजनाथ सिंह, अमित शहा, नितीन गडकरी, जेपी नड्डा, शिवराज सिंह चौहान यांनी शपथ घेतली. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी पंतप्रधान व मंत्रिमंडळातील अन्य सदस्यांना पद व गोपनीयतेची शपथ दिली. ईश्वराचे स्मरण करून, पंतप्रधानांनी हिंदीत ७.२३ वाजता शपथ घेतली.
त्यानंतर राजनाथसिंह, अमित शहा, नितीन गडकरी, जे. पी नड्डा, शिवराजसिंह चौहान, निर्मला सितारामन, पियुश गोयल, धर्मेंद्र प्रधान, ललनसिंह, गजेंद्रसिंह शेखावत यांनी मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेतली. पंतप्रधानांच्या शपथविधीला नेपाळ, बांगलादेश, मालदीव, श्रीलंका, भूतान आदी देशांच्या राष्ट्रप्रमुखांची उपस्थिती होती. माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद, मुख्य न्यायाधीश चंद्रचूड, नितीश कुमार, चंद्राबाबू नायडू, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्यासह विविध राज्यांचे मुख्यमंत्र्यांची शपथविधी सोहळ्याला उपस्थिती होती. ठीक सव्वा सात वाजता नरेंद्र मोदींचे कार्यक्रमस्थळी आगमन झाले. पांढराशुभ्र झब्बा, पायजामा, निळ्या रंगाचे जॅकेट असा वेश पंतप्रधानांनी आज धारण केला होता. पंतप्रधानांच्या आगमनानंतर काही वेळातच राष्ट्रपतींचे आगमन झाले. राष्ट्रगीताची धून वाजली आणि शपथविधीला सुरूवात झाली. राष्ट्रपती भवनात एका अतिभव्य, फुलांनी सजवलेल्या मंचावर हा देखणा सोहळा पार पडला.
* राजनाथसिंह, अमित शहा, नितीन गडकरी, जे. पी नड्डा, शिवराजसिंह चौहान, निर्मला सितारामन, पियुश गोयल, धर्मेंद्र प्रधान, ललनसिंह, गजेंद्रसिंह शेखावत, सुब्रमण्यम जयशंकर, मनोहर लाल, एच डी कुमारस्वामी, जितनराम मांझी, राजीव रंजन सिंह, सर्वानंद सोनोवाल, डॉ. वीरेंद्र कुमार, आय. राममोहन नायडू, प्रल्हाद जोशी, जुएल ओराम , गिरीराज सिंग, अश्विनी वैष्णव, ज्योतिरादित्य शिंदे, भूपेंद्र यादव, गजेंद्रसिंह शेखावत, अन्नपूर्णा देवी, किरण रिजिजू, हरदीपसिंग पुरी, डॉ. मनसुख मांडव्या, जी. किशन रेड्डी, चिराग पासवान, सी. आर पाटील, यांनी मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेतली.
राव इंद्रजित सिंह, डॉ. जितेंद्र सिंग, अर्जुनराम मेघवाल, प्रतापराव जाधव, जयंत चौधरी यांनी स्वतंत्र प्रभार असलेल्या राज्यमंत्री पदाची शपथ घेतली.
जितेंद्र प्रसाद, श्रीपाद नाईक, पंकज चौधरी, श्रीकृष्ण पाल, रामदास आठवले, रामनाथ ठाकूर, नित्यानंद राॅय, अनुप्रिया पटेल, व्ही सोमन्ना, डॉ. पी. चंद्रशेखर, प्रा. एस पी सिंग बघेल, शोभा करणराजे, कीर्तीवर्धन सिंग, बी.एल.वर्मा, शांतनू ठाकूर, सुरेश गोपी, डॉ. एल. मुरुगन, अजय तमटा, बी. संजय कुमार, कमलेश पासवान, भगिरथ चौधरी, सतिशचंद्र दुबे, संजय सेठ, नवनीत सिंग, दुर्गादास उईके, रक्षा खडसे, श्रीकांत मुजुमदार, सावित्री ठाकूर, तोकन साहू, राजभूषण चौधरी, भूपती राजू श्रीनिवास वर्मा, हर्ष मल्होत्रा, निमुबेन बांगडिया, मुरलीधर मोहोळ यांनी राज्यमंत्री म्हणून शपथ घेतली.
महाराष्ट्रातून पियुश गोयल, सी. आर. पाटील,रामदास आठवले, दुर्गादास उईके, रक्षा खडसे, मुरलीधर मोहोळ यांना, तर विदर्भातील नितीन गडकरी, प्रतापराव जाधव यांना मंत्रिमंडळात स्थान मिळाले आहे.
* निर्मला सितारामन, अन्नपूर्णा देवी, अनुप्रिया पटेल, शोभा करणराजे, रक्षा खडसे, सावित्री ठाकूर, निमुबेन बांगडिया या महिलांना मंत्रिमंडळात स्थान मिळाले आहे
* सुमारे १६० मिनिटे चाललेल्या या शपथविधी सोहळ्याची राष्ट्रगीताच्या धून ने सांगता झाली
* ३२ कॅबिनेट, ५ स्वतंत्र प्रभार असलेले राज्यमंत्री आणि ३९ राज्यमंत्री यांचा समावेश नवीन केंद्रीय मंत्रिमंडळात आहे